घरमहाराष्ट्रपूरग्रस्तांसाठी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीतर्फे मदतीचा हात

पूरग्रस्तांसाठी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीतर्फे मदतीचा हात

Subscribe

सर्व स्थरातून पूरग्रस्तांना मदत केली जात आहे. आता देवस्थानदेखील पाठीमागे राहिले नाही. श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी यांच्यावतीने पूरग्रस्तांसाठी प्रत्येकी दहा लाख रूपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्यात आला.

सांगली, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आलेल्या महापुरामुळे प्रचंड मोठी हानी झाली. सद्य परिस्थितीला पुराची पातळी ओसरली असली तरी अनेकांचे संसार उध्वस्त होऊन जनजीवन विस्कळीत झाले आहे. सर्व स्थरातून पूरग्रस्तांना मदत केली जात आहे. आता देवस्थानदेखील पाठीमागे राहिले नाही. श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी यांच्यावतीने सांगली, कोल्हापूर जिल्ह्यामधील पूरग्रस्तांसाठी प्रत्येकी ५ लाख रुपये या प्रमाणे एकूण दहा लाख रूपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्याकडे देण्यात आला. यावेळी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त विकास ढगे पाटील हे उपस्थित होते.

सतत सुरू असलेल्या पावसामुळे काही दिवसांपूर्वी कोल्हापूर, सांगली आणि सातारा येथे पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर महाराष्ट्र राज्यासह देशातून पूर ओसरावा म्हणून प्रार्थना केली जात होती. पूरपरिस्थितीत अनेकांना आहे तशा अवस्थेत नागरिकांना घर सोडावे लागले होते. तर घरातील सर्व साहित्य पाण्यात गेले होते. यामुळे महाराष्ट्रातील सर्व स्तरातून मदत केली गेली, अनेकांचे संसार उध्वस्त झाले. त्यांना पुन्हा उभारी मिळण्यासाठी मदत अत्यंत गरजेचे होती. त्यामुळेच अनेक संस्था, नागरिकांनी पुढे येऊन सढळ हातांनी मदत केली. सध्या पूर ओसरला असून नागरिक आपापल्या घरात पुन्हा संसाराची मांडणी करत आहेत. दरम्यान, पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी मदतीचे आवाहन केले होते. मदतीचे आवाहनाला प्रतिसाद देत श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी यांचे वतीने सांगली-कोल्हापूर जिल्ह्यामधील पूरग्रस्तांसाठी प्रत्येकी रक्कम रुपये ५ लाख रुपये या प्रमाणे एकूण दहा लाख रूपयांचा धनादेश देण्यात आला.

- Advertisement -

सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून या संस्थेच्या वतीने पूरग्रस्त भागात प्रत्यक्ष भेट देवून आवश्यक तेथे संसार उपयोगी भांडी, धान्य, किराणा, शालेय साहित्य, पिण्याचे पाणी, घर दुरुस्तीसाठी आर्थिक मदत करणार असल्याचे प्रमुख विश्वस्त विकास ढगे पाटील यांनी सांगितले. त्यासाठी सांगली व कोल्हापूर येथील जिल्हाधीकार्यांशी याबाबत संपर्क करण्यात आला असून त्यांनी सूचना व मार्गदर्शनानुसार मदत करणार असल्याची माहिती यावेळी दिली. तसेच यावेळी त्यांनी परिसरातील ग्रामस्थ व भाविकानांही मदतीचे आवाहन करत भविष्यात ही पूरग्रस्तांचे पुनर्वसनासाठी भरीव मदत करण्याचा निर्णय विश्वस्त मंडळाने घेतल्याचे सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -