घरमहाराष्ट्रज्येष्ठ लेखक श्रीधर माडगूळकर यांचे निधन

ज्येष्ठ लेखक श्रीधर माडगूळकर यांचे निधन

Subscribe

महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी गदिमा यांचे सुपूत्र आणि गदिमा साहित्य कला अकादमीचे विश्वस्त श्रीधर माडगूळकर यांचे निधन.

महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी गदिमा यांचे सुपूत्र आणि गदिमा साहित्य कला अकादमीचे विश्वस्त श्रीधर माडगूळकर यांचे निधन झाले आहे. पुण्यातील एका खासगी रुग्णालयात त्यांनी वयाच्या ७२ व्या वर्षी आज अखेरचा श्वास घेतला. बुधवारी खासगी रुग्णालयात त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. मात्र उपचारानंतर गुरुवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पाश्चात पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.

माडगूळकर यांच्याविषयी थोडक्यात

श्रीधर माडगूळकर यांचा जन्म ६ फेब्रुवारी १९४७ रोजी झाला. तसेच त्यांचे प्राथमिक शिक्षण मॉर्डन हायस्कूल येथे झाले होते. तर त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालयात घेतले होते. श्रीधर माडगूळकर यांनी १९७० साली ‘जिप्सी’ या खास तरुणांसाठी असलेल्या मासिकाचे संपादन करुन अनेक नवीन लेखकांना पुढे येण्यास संधी दिली. तसेच त्यांच्या अनेक कथा महाराष्ट्रातील नियतकालिकांमधून प्रसिद्ध झाल्या असून श्रीधर माडगूळकर यांची ‘आठी आठी चौसष्ट’ ही कादंबरी राजकीय क्षेत्रात मैलाचा दगड समजली जाते. त्याचप्रमाणे त्यांनी ‘धरती’ आणि
साप्ताहिक ‘मायभूमी’ या नियतकालिकांमधून उपसंपादक म्हणून देखील काम केले होते.

- Advertisement -

तसेच गदिमांच्या आठवणींवरील ‘मंतरलेल्या आठवणी’ हे पुस्तक प्रसिद्ध असून त्यांनी अनेक वृत्तपत्रांमधून लेखन देखील केले होते. दूरदर्शन तसेच आकासवाणीवरील अनेक कार्यक्रमात त्यांचा सहभाग असायचा. त्यांनी १९९७ साली इंटरनेटवर मराठी भाषेतील ‘जाळं’ या पहिल्या साप्ताहिकाची सुरुवात करुन याचे यशस्वी संपादन देखील केले. त्याचप्रमाणे त्यांनी गोवा येथे भरलेल्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या आठव्या शेकोटी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष देखील होते. १९७८ साली त्यांची पुणे शहर युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी आणि शहर काँग्रेसच्या सरचिटणीसपदी निवड झाली. क्रीडा क्षेत्रातही त्यांचा सक्रीय सहभाग होता.


हेही वाचा – इंग्रजी वाचकांनाही गदिमांचे साहित्य चाखायला मिळणार

- Advertisement -

हेही वाचा – स्वत:चा वेगळा प्रेक्षकवर्ग निर्माण करणार्‍या लालन सारंग


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -