घरमहाराष्ट्रशिवसेनेचे उमेदवार श्रीकांत शिंदेंनी वृक्षरोपण करुन भरला उमेदवारी अर्ज

शिवसेनेचे उमेदवार श्रीकांत शिंदेंनी वृक्षरोपण करुन भरला उमेदवारी अर्ज

Subscribe

महिलांचे लेझिम पथक, ढोलताशांचे पथक, आणि आदिवासी बांधवांचे तारपा नृत्य हे मिरवणुकीतील विशेष आकर्षण ठरले.

कल्याण लोकसभा मतदार संघातून महायुतीचे उमेदवार डॉ श्रीकांत शिंदे यांनी मंगळवारी सकाळी आगळयावेगळया पध्दतीने उमेदवारी अर्ज सादर केला. गणेश मंदिराजवळील उद्यानात वृक्षरोपण करून पर्यावरणाचा संदेश देत उमेदवारी अर्ज सादर केला. यावेळी शिवसेनेने जोरदार शक्तीप्रदर्शन केले. महिलांचे लेझिम पथक, ढोलताशांचे पथक, आणि आदिवासी बांधवांचे तारपा नृत्य हे मिरवणुकीतील विशेष आकर्षण ठरले.

- Advertisement -

पर्यावरण रक्षणाचा संदेश देत शक्तीप्रदर्शन

आघाडीचे उमेदवार बाबाजी पाटील यांनी सोमवारी अर्ज सादर करून जोरदार शक्तीप्रदर्शन केले होते. त्यामुळे मंगळवारी शिवसेनेनेही भव्य मिरवणुक काढून शक्तीप्रदर्शन केले. डोंबिवलीतील श्री गणेश मंदिरात गणरायाचे दर्शन घेऊन शिंदे यांनी तेथील उद्यानात वृक्षारोपण केले. त्यानंतर ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत मिरवणुक देखील काढण्यात आली. मिरवणुकीतही पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारा रथ साकारण्यात आला होता.

- Advertisement -

पर्यावरण हा प्रत्यक्ष कृतीचा विषय

या मिरवणुकीत पालकमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री रविंद्र चव्हाण जिल्हा प्रमुख पुंडलिक म्हात्रे रिपाइंचे डोंबिवली शहर अध्यक्ष अंकुश गायकवाड, रिपाइंचे कल्याणचे अण्णासाहेब रोकडे यांच्यासह शिवसेना भाजप रिपाइंचे कार्यकर्ते मोठया संख्येने सहभागी झाले होते. शिंदे यांनी दोन उमेदवारी अर्ज सादर केले. पर्यावरण हा आपल्यासाठी केवळ बोलण्याचा विषय नसून प्रत्यक्ष कृतीचा आणि जबाबदारीचा विषय आहे, असे त्यांनी अर्ज दाखल करण्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -