घरगणपती उत्सव बातम्याश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची महापौरांच्या हस्ते आरती

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची महापौरांच्या हस्ते आरती

Subscribe

पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची आरती महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते करण्यात आली. आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी पुण्याच्या रस्त्यांवर नागरीकांचा जनसागर लोटला होता.

अनंत चतुर्दशीच्या मुहुर्तावर राज्यभरातून गणपती बाप्पाची विसर्जनासाठी निघालेली मिरवणूक दुसऱ्या दिवशीदेखील पाहायला मिळाली. पुण्याच्या मानाच्या गणरायांची देखील मिरवणूक रात्रभर सुरू होती. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची पुण्याचे महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते पहाटे टिळक चौकात आरती करण्यात आली. त्यानंतर ही मिरवणूक विसर्जन घाटाकडे मार्गस्थ झाली.

dagadusheth halawayi ganapati
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची महापौरांनी केली आरती

सोमवारी पहाटे ३.४१ श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची मिरवणूक भाऊ रंगारी मंडळ टिळक चौकातून विसर्जन घाटाकडे रवाना झाली. काही वेळात ही मिरवणूक अखिल मंडई मंडळ टिळक चौकात दाखल झाली. तर तेथून ही मिरवणूक अखिल मार्केटयार्ड मंडळ टिळक चौकातून विसर्जन घाटाकडे निघाली.

- Advertisement -
 pune ganapati
पुण्याच्या गणपती विसर्जनाची मिरवणूक

बाबू गेनू मंडळाचा गणपतीदेखील मध्यरात्री टिळक चौकातून विसर्जन घाटाकडे रवाना झाला.

पुण्याच्या लक्ष्मी रस्त्याने सोमवारी पहाटेपर्यंत फक्त २६ मंडळेच मार्गस्थ झाली. तर सुमारे १५० मंडळं अजून या मार्गाने विसर्जनासाठी जाणार आहेत. तसेच पुण्यातील इतर रस्त्याने जाणारी मंडळं देखील विसर्जनाच्या दिशेने मार्गस्थ झाली आहेत. पुण्यातील विसर्जन मिरवणूक संपण्यास सोमवार दुपारी ३ ते ४ वाजण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -