घरमहाराष्ट्रशक्तिप्रदर्शन करत श्रीरंग आणि पार्थ यांनी केला उमेदवारी अर्ज दाखल

शक्तिप्रदर्शन करत श्रीरंग आणि पार्थ यांनी केला उमेदवारी अर्ज दाखल

Subscribe

मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार विद्यमान खासदार श्रीरंग बारणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस तसेच घटक पक्ष्याचे उमेदवार पार्थ पवार यांनी हजारों कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आज रॅली काढत आपला उमेदवारी अर्ज निवडणूक कार्यलयात दाखल केला आहे. यावेळी शिवसेनेकडून आदित्य ठाकरे तर राष्ट्रवादीकडून अजित पवार देखील सहभागी झाले होते.

मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार विद्यमान खासदार श्रीरंग बारणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस तसेच घटक पक्ष्याचे उमेदवार पार्थ पवार यांनी हजारों कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आज रॅली काढत आपला उमेदवारी अर्ज निवडणूक कार्यलयात दाखल केला आहे. शिवसेनेकडून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अमर साबळे, आमदार गौतम चाबुकस्वार तर राष्ट्रवादी पक्ष्याकडून काँग्रेस शहराध्यक्ष सचिन साठे, नगरसेवक मयूर कलाटे आदी यावेळी उपस्थित होते. या दोघांनीही यांच्या प्रमुख उपस्थितीत अर्ज दाखल केला आहे. अर्ज दाखल करण्यापूर्वी रॅली काढून जोरदार शक्तीप्रदर्शन देखील करण्यात आले.

शिवसेनेकडून आदित्य ठाकरे तर राष्ट्रवादीकडून अजित पवार सहभागी

खासदार श्रीरंग बारणे आणि पार्थ अजित पवार यांनी मंगळवारी दुपारी निगडी येथील पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या सातव्या मजल्यावरील निवडणूक कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याअगोदर दोन्ही पक्ष्याच्या वतीने पदयात्रा (रॅली) काढण्यात आली. राष्ट्रवादी पक्ष आणि घायन पक्ष्याच्या कार्यकर्त्यांनी चिंचवड अहिर गार्डन येथून पद यात्रा काढली यात अजित पवारसह आजी माजी नगरसेवक देखील उपस्थित होते. फुलांनी सजलेल्या घड्याळाची प्रतिकृती तयार करण्यात आली होती. ढोल ताश्यांच्या गजरात कार्यकर्ते जल्लोष करत होते. पार्थ पवार यांच्या नावाने जयघोष करत होते. तर शिवसेना महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या कार्यकर्त्यांनी आकुर्डीतील खंडोबा मंदिर चौक ते प्राधिकरण कार्यालयापर्यंत रॅली काढली. यावेळी अवघा रस्ता भगवामय झाल्याच पाहायला मिळालं. दरम्यान, दोन्ही पक्षाकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले होते यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -