सिंधी समाजासाठी हडटी वरदान, निर्माता मात्र वंचित

सिंधी समाजासाठी वरदान ठरणारी हटडी. मात्र त्याचा निर्माता असणाऱ्या वाघरी समाज अपेक्षित लाभापासून लांबच आहे. त्यामुळे लक्ष्मी आमच्याबाबत दुजाभाव का करते? अस सवाल आता वाघरी समाज करत आहे.

ulhasnagar
hatdi

सिंधू संस्कृतीची ओळख सांगणारा आणि उद्योगशील व्यापारी म्हणून उल्हासनगरातील सिंधी समाज जगभर प्रसिद्ध आहे. अत्यंत श्रद्धाळू व अध्यात्म प्रिया हा समाज दैवपूजक देखील आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर येणारे लक्ष्मीपूजन त्यांच्यासाठी विशेष महत्त्वाचे. त्यानिमित्ताने लक्ष्मी पूजनाकरीता हटडीची दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. व्यापार म्हटले की दुकान आले. दुकान हे सिंधी समाजाच्या श्रद्धास्थानी. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हटडी या प्रतीकात्मक दुकानाची हा समाज मोठ्या मनोभावे पूजा करतो.  मातीच्या गोलाकार चकतीवर त्रिकोणात्मक चार बांबूच्या काड्या रोवुन रंगवलेल्या या  हटडीच्या प्रतिकात्मक दुकानात ( हटडीत ) सिंधी व्यापारी मिठाई, पैसे आणि चिभर ठेवतो. त्यानंतर सहपरिवार,  दुकानाचे मालक, नोकर सगळे मिळून लक्ष्मीची आराधना करतात. त्यामुळे लक्ष्मी मातेचं वरदान लाभून धंद्यात सम्रुध्दी  होते अशी श्रद्धा असल्याचे नानक मंगलानी यांनी ‘माय महानगर’शी बोलताना सांगितले.

शहरातील गरीब वाघरी समाज ही हटडी बनवण्याचे काम गेली ६५ वर्षे करतोय. दिवाळीच्या आधीच दोन महिन्यांपासून चिकन माती, शेण, बांबूच्या काड्या, चुना, गेरुचे रंग, रंगीत कागद या मिश्रणापासून हटडी बनविण्यासाठी हे वाघरी कलावंत कामाला लागतात. दरवर्षी शहरातील किमान शंभर एक कुटुंबांपैकी प्रत्येक कुटुंब दोन ते अडीच हजार हटडी बनवतात. काही वाघरी हे येथील स्थानिक आहेत. तर, काही वाघरी केवळ या  हंगामात हटडी  बनवून  विकण्यासाठी  हे पालघर, अहमदाबाद, सुरत येथून दोन महिन्यांकरिता उल्हासनगरमध्ये येतात. या दोन महिन्यामध्ये यांचा संसार हा रस्तावरच थाटतात. मात्र, ऐवढी प्रचंड मेहनत करूनही हटडीची जोडी ४० ते ५०  रूपयांपेक्षा जास्त किंमत या वाघरींना मिळवुन देत नाही. सिंधी बांधवांना समृद्ध देणारी ही हटडी  मात्र हटडीच्या निर्मात्या वाघरी समाजाला पिढ्यानपिढ्या त्याच परिस्थितीमध्ये झगडत ठेवते. लक्ष्मी आमच्याबाबत दुजाभाव का करते? असा सवाल वीस वर्षांपासून अहमदाबादहून उल्हासनगरात येऊन हटडी विकणाऱ्या संजय केशु काळे आणि अजय राजेश काळे या दोन पिढ्यांमधील वाघरींनी उपस्थित केला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here