घरमहाराष्ट्र#Metoo : '१० वर्षानी आवाज उठवणं चुकीचं'

#Metoo : ‘१० वर्षानी आवाज उठवणं चुकीचं’

Subscribe

अत्याचार झाला तेव्हाच आवाज का उठवला नाही?. १० ते १५ वर्षानंतर बोलणं चूकचं आहे. असे मत अनाथांची माय असलेल्या सिंधुताई सकपाळ यांनी मांडले आहे.

#Metoo चळवळ सध्या जोरात सुरू आहे. #Metoo बद्दल आत्तापर्यंत अनेकांनी आपल्यावर झालेल्या अत्याचाराबद्दल वाचा फोडली आहे. त्याला काहींनी पाठिंबा दिला तर काहींनी याबद्दल एवढा उशीर का? अशी विचारणा केली आहे. अनाथांची माय असलेल्या सिंधुताई सकपाळ यांनी देखील याबद्दल आता आपले मत मांडले आहे. अत्याचार झाला तेव्हाच आवाज का उठवला नाही?. १० ते १५ वर्षानंतर बोलणं चूकचं आहे. यामध्ये निर्दोषही भरडले जातील अशी टीका सिंधुताईंनी केली आहे. अहमदनगरमधील लाडजळगाव येथील एका कार्यक्रमासाठी सिंधुताई आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी ही टीका केली. ‘#Metoo मोहीम अत्यंत वाईट आहे. त्यामुळे निर्दोष लोकांनाही शिक्षा भोगावी लागते, असं म्हणत अत्याचाराला १० वर्षानंतर वाचा कशी फुटू शकते? अत्याचार झाला तेव्हाच का बोलला नाहीत ? असा सवालही सिंधुताईंनी केला. जेव्हा काळजात कळ येते तेव्हा माणूस मुका राहूच शकत नाही, असंही देखील सिंधुताई म्हणाल्या. ज्याप्रमाणे स्त्री कुणाची तरी आई, बहिण, पत्नी आहे त्याप्रमाणे पुरूष देखील कुणाचा तरी भाऊ, पत्नी असतो हे देखील ध्यानात ठेवायला हवे.

वाचा – #Metoo विरूद्ध #Mentoo

वाचा – अखेर रजनीकांत #MeToo चळवळीबद्दल बोलले

#Mantoo आणि #Hetoo

#Metoo नंतर आता #Mantoo आणि #Hetoo चळवळ देखील सध्या सुरू करण्यात आली आहे, पुरूषांवर होणाऱ्या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी #Mantoo आणि #Hetoo सुरू करण्यात आली आहे. आत्तापर्यंत अनेकांवर लौंगिक अत्याचाराचे आरोप झाले आहेत. लैंगिक अत्याचाराच्या आरोपानंतर गायक अनु मलिक यांना सारेगमपच्या पंच पदावरून पायउतार देखील व्हावे लागले आहे. दरम्यान परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांना देखील लैंगिक शोषणाच्या आरोपानंतर पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. दरम्यान, या साऱ्या प्रकरणांमध्ये पुढे काय होते हे पाहावे लागणार आहे.

वाचा – #He Too बद्दल तुम्हाला माहित आहे का?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -