घरमहाराष्ट्रनाशिकदुर्देवी; अमेरिकेतून परतत असताना प्रसिद्ध गायिका गीता माळी यांचे निधन

दुर्देवी; अमेरिकेतून परतत असताना प्रसिद्ध गायिका गीता माळी यांचे निधन

Subscribe

नाशिकमधील प्रसिद्ध गायिका गीता माळी यांचे गुरुवारी (दि.१४) शहापूरनजीक अपघाती निधन झाले. अमेरिका आणि न्यूयॉर्क येथील कार्यक्रमामध्ये सहभागासाठी गेलेल्या गीता माळी दीड महिन्यांनंतर घरी परतत होत्या. परदेशातील कार्यक्रमासाठी गीता माळी या नाशिकमधून रवाना झाल्या होत्या. नाशिकला परतताना दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास शहापूरनजीक त्यांच्या वाहनाला भीषण अपघात झाला. त्यात गिता माळी यांचा जागीच मृत्यू झाला, तर अॅड. विजय माळी हे जखमी झाले.

आज सकाळचा मुंबई विमानतळावरील त्यांचा सेल्फी

नक्की काय घडले?

गीता माळी या गेल्या तीन महिन्यांपासून अमेरिकेत गायनाच्या कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. मुंबई विमानतळावर आल्यानंतर त्यांचे पती विजय माळी यांच्यासोबत त्या नाशिकला कारने येत होत्या. दुपारी तीन वाजेच्या सुमारास त्यांची कार ठाणे जिल्ह्यातील शहापूर परिसरात असलेल्या लाहे फाटानजीक आली असताना श्वानाला वाचविण्याच्या नादात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरवर धडकली. या घटनेत माळी यांना गंभीर दुखापत झाली होती. तात्काळ त्यांना शहापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

- Advertisement -

२०१७ ऑस्ट्रेलियामधील सिडनी या शहरात वीर सावरकर विश्व साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी गायिका गीता माळी यांना गायनासाठी निमंत्रित करण्यात आले होते. तसेच दैनिक देशदूत आयोजित कर्मयोगिनी पुरस्कारांत गीता माळी यांना नामांकन मिळाले होते.

गीता माळी यांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे शहरातील संपूर्ण सांस्कृतिक क्षेत्रावर शोककळा पसरली. माळी यांनी अल्पावधीतच गाण्यांमध्ये आपली छाप पाडली होती. त्यांचा चाहता वर्गदेखील मोठा आहे. यापूर्वी त्यांनी ऑस्ट्रेलियामध्येदेखील गायिकेची छाप पाडली होती. शास्त्रीय आणि चित्रपट गाणी गाण्यात त्यांचा हातखंडा होता. त्यांनी संगीतात एम.ए. केलेले होते. त्यांच्या पश्चात पतीसह आठ वर्षाचा मुलगा देखील आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -