घरताज्या घडामोडीसिन्नर नगरपरिषदेत पारनेरची पुनरावृत्ती : उपनगराध्यक्षपदी सेना बंडखोर उमेदवार उगले यांची वर्णी

सिन्नर नगरपरिषदेत पारनेरची पुनरावृत्ती : उपनगराध्यक्षपदी सेना बंडखोर उमेदवार उगले यांची वर्णी

Subscribe

राष्ट्रवादी आमदारांनी फोडले शिवसेनेचे पाच नगरसेवक

नाशिकमधील महत्त्वाच्या नगरपरिषदांपैकी एक असलेल्या सिन्नर नगरपरिषदेत राष्ट्रवादीने शिवसेनेला मोठा धक्का दिलाय. उपनगराध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे तब्बल पाच नगरसेवक फुटल्याने पारनेरची पुनरावृत्ती या ठिकाणी झाल्याचे दिसून आले. राष्ट्रवादीचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी शिवसेना बंडखोरालाच निवडून आणले.
शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये आता पुन्हा तणाव निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. राष्ट्रवादीच्या कोकाटे गटाने सेनेचे पाच नगरसेवक फोडल्याने पारनेरप्रमाणेच आता नाशिक जिल्ह्यातही राजकीय धुराळा उडण्याची दाट शक्यता आहे. उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून प्रणाली गोळेसर यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे शिवसेनेच्या बाळासाहेब उगले यांनी बंडखोरी करत त्यांच्याविरोधात अर्ज भरला आणि विजय प्राप्त केला.
उगले यांना आमदार माणिकराव कोकाटे गटाच्या मदतीने पंधरा मते मिळाली. तर दुसरीकडे गोळेसर यांना मात्र 14 मतांवर समाधान मानावे लागले. सेनेच्या पाच नगरसेवकांनी ऐनवेळी पक्षाविरोधात भूमिका घेतल्याने अनपेक्षित निकाल बघावयास मिळाला आहे.

Saiprasad Patil
Saiprasad Patilhttps://www.mymahanagar.com/author/sppatil/
गेल्या १३ वर्षांपासून नाशिकमध्ये पत्रकारितेचा अनुभव. सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, गुन्हेगारी यासह विविध विषयांवर लिखाण. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य आणि स्थानिक स्तरावरील घडामोडींवर लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -