दाभोलकर हत्येप्रकरणी पुढील आठवड्यात आरोपपत्र दाखल करू – एसआयटी

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी पुढील आठवड्यात आरोपपत्र दाखल करु, अशी माहिती एसआयटी मुंबई हायकोर्टात दिली आहे.

Maharashtra
bombay high court
मुंबई हायकोर्ट

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी पुढील आठवड्यात आरोपपत्र दाखल करु, अशी माहिती विशेष तपास पथकाने (एसआयटी) मुंबई हायकोर्टात दिली आहे. फरार आरोपींचा शोध मात्र अद्यापही सुरू असल्याचे हायकोर्टात सांगण्यात आले. दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ रोजी पुण्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. यानंतर गोविंद पानसरे यांची देखील हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी दोन्ही कुटुंबीयांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केल्या आहेत. या याचिकांवर बुधवार, ६ फेब्रुवारी रोजी मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. यावेळी एसआयटीने ही माहिती दिली.

ही दिली माहिती

दाभोलकर- पानसरे हत्या प्रकरणातील तपासाचा प्रगती अहवाल हायकोर्टात सादर करण्यात आला. दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपपत्र पुढील आठवड्यात दाखल करु, अशी माहिती विशेष तपास पथकाने (एसआयटी) हायकोर्टात दिली. या प्रकरणातील फरार आरोपींचा शोध सुरु असल्याचे एसआयटीने कोर्टात सांगितले.

दाभोलकरांची हत्या

२० ऑगस्ट २०१३ रोजी डॉ. नरेंद्र दाभोलकर ‘मॉर्निंग वॉक’साठी पुण्याच्या ओंकारेश्वर पुलावर गेले होते. पुलावर आधीपासूनच दाभोलकरांना ओळखणारे दोनजणं हजर होते. दाभोळकर निश्चित स्थळी पोहचताच त्या दोघांनी तिथे आलेल्या शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांच्याकडे ‘हेच दाभोलकर आहेत का’? अशी विचारणा केली. दाभोलकर हेच असल्याची खात्री पटल्यावर त्या दोघांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यामुळे, गोळी झाडणाऱ्या दोघांच्या कटात दाभोलकरांची ओळख पटवून देणारे कळसकर आणि अंदुरे हेही सहभागी असल्याचं सीबीआयने म्हटलं होतं.

हेही वाचा – 

दाभोलकर हत्या प्रकरणातील आणखी दोन आरोपींना जामीन

दाभोलकरांशी परिचय असल्याने न्यायमूर्तींचा सुनावणीला नकार

दाभोलकर हत्याप्रकरण : हायकोर्टाने CBI ला फटकारले