घरमहाराष्ट्र‘एसएमबीटी’मध्ये आरोग्यसेवेचा विक्रम; वर्षभरात तब्बल पाच लाख रुग्णांवर उपचार

‘एसएमबीटी’मध्ये आरोग्यसेवेचा विक्रम; वर्षभरात तब्बल पाच लाख रुग्णांवर उपचार

Subscribe

उत्तर महाराष्ट्राच्या आरोग्यसेवेत मानाचा तुरा रोवलेल्या एसएमबीटी हॉस्पिटलला आता राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. एसएमबीटीमध्ये उत्तम आरोग्यसेवा आणि अत्याधुनिक उपचार पद्धतीचा अवलंब केला जात असल्याने २०१९ मध्ये तब्बल पाच लाख रुग्णांनी उपचार घेतले आहेत. एसएमबीटीमध्ये आता उपचारासाठी उत्तर महाराष्ट्रासह पुणे, अहमदनगर, ठाणे, मुंबई परिसर, मराठवाडा विभाग अशा २८ जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात रुग्ण आरोग्यसेवेचा लाभ घेण्यासाठी येत आहेत.

एसएमबीटीवर सर्वसामान्य रुग्णांचा वाढलेला विश्वास ही आमच्यासाठी मोठी अभिमानाची गोष्ट आहे. जनसेवा हीच रुग्णसेवा म्हणत गरीब आणि गरजू रुग्णांना तातडीने दर्जेदार आरोग्यसेवा मिळाव्यात हीच भावना एसएमबीटी हॉस्पिटलच्या डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांमध्ये रुजवलेली आहे. एसएमबीटी हॉस्पिटल आणि संलग्न क्लिनिकच्या माध्यमातून दररोज 2500 रुग्णांना आरोग्यसुविधेचा फायदा होत आहे. यात सरासरी 1000 अंतररुग्ण (आयपीडी) आहेत.
एसएमबीटीमध्ये विविध आजारांवर उपचार व शस्त्रक्रिया केल्या जातात. सर्व सोयीसुविधांनी अद्ययावत असलेल्या एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये दररोज 60 ते 70 रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया केल्या जातात तर दररोज किमान 15 हृदयरोग शस्त्रक्रियाही येथे होतात. 2019 या वर्षात एसएमबीटी हॉस्पिटल आणि आठ क्लिनिकच्या माध्यमातून 5 लाख 24 हजार 254 रुग्णांनी आरोग्य सुविधांचा लाभ घेतलेला आहे तर तीस हजारांहून अधिक शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आल्या आहेत. यातील 9167 शस्त्रक्रिया किचकट स्वरूपाच्या होत्या. तर तीन हजार 172 हृदय शस्त्रक्रिया करण्यात आल्या.

- Advertisement -

smbt hospital building

एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये तीस वर्षांहून अधिकचा आरोग्यसेवेचा अनुभव असलेले तज्ज्ञ डॉक्टर्स कार्यरत आहेत. रस्ते अपघात, अति तातडीच्या आरोग्यसुविधा, लहान मुलांचे आजार, हृदय उपचार, कर्करोग, स्त्री रोग आदी आरोग्य सुविधांवर एसएमबीटीने लक्ष केंद्रित केले आहे. याशिवाय प्रदूषणामुळे निर्माण होणाऱ्या समस्या, साथीचे आजार, पौगंडावस्थेतील समस्या, कर्करोगाचे वाढते प्रमाण या सार्वजनिक आरोग्याच्या बाबतीतही एसएमबीटीने अत्यंत पद्धतशीर काम सुरू ठेवले आहे.

- Advertisement -

एसएमबीटी हॉस्पिटलने व्यापक रुग्णसेवेच्या भूमिकेतून सुसज्ज कँसर उपचार केंद्र, अत्याधुनिक किडनीरोग उपचार केंद्र, स्वतंत्र मेंदूशस्त्रक्रिया विभाग, स्वतंत्र व सुसज्ज खासगी उपचार विभाग आणि दुर्धर आजाराने ग्रस्त रुग्णांसाठी पॅलेटिव्ह केअर युनिट उभारण्याच्या दृष्टीने काम सुरू केले आहे, राज्याच्या आरोग्य क्षेत्रातील पंढरीच नाशिक मध्ये एसएमबीटी हॉस्पिटलच्या माध्यमातून साकार झाली आहे.

2019 मध्ये एसएमबीटीमध्ये उपचार घेतलेल्या रुग्णांची संख्या

बाह्यरुग्ण : 440848
शस्त्रक्रिया : 31432
किचकट शस्त्रक्रिया 9167
हृदयशस्त्रक्रिया : 3172
डिव्हाईस क्लोजर : 762

राज्यभरातून रुग्ण

उत्तर महाराष्ट्र : 345654
मुंबई कोंकण : 87675
पश्चिम महाराष्ट्र : 42356
मराठवाडा : 24564
विदर्भ : 18912
राज्याबाहेरील रुग्ण : 5093

महाराष्ट्रातील एसएमबीटी क्लिनिक

नाशिक
श्रीरामपूर
संगमनेर
चाळीसगाव
इगतपुरी
अकोले
भिवंडी
शहापूर

एसएमबीटी हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रातील स्पर्धेपासून स्वतःला दूर ठेवू इच्छिते. समाजातील वंचित आणि गरजू घटकांसाठी काम करणे ही आमची जबाबदारी आहे ही भावना एसएमबीटीच्या संपूर्ण परिवारात बघायला मिळते. रुग्णांना परवडणाऱ्या दरात आरोग्य सुविधा देताना एसएमबीटीने आरोग्यसुविधांसोबत तडजोड केलेली नाही. त्यामुळेच समाजातूनही एसएमबीटीच्या आरोग्यसुविधांना उत्तम प्रतिसाद मिळत आहे. – डॉ. हर्षल तांबे, विश्वस्त, एसएमबीटी परिवार

Kishor Gaikwadhttps://www.mymahanagar.com/author/kishor/
एकेकाळी कार्यकर्ता होतो (कोणता ते विचारू नका) आता पत्रकार झालोय. तटस्थ वैगरे आहेच. पण स्वतःला पुरोगामी वैगरे म्हणवून घेतो. तसा राहण्याचा प्रयत्नही करतो. लिहायला, वाचायला, फिरायला आवडतं. सध्या सर्व वेळ टोरंटवर जातोय. बाकी इथे लिहितच राहिल. नक्की वाचा... आपला मित्र किशोर गायकवाड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -