घरमहाराष्ट्रपावसाळी अधिवेशनाला सापांचा विळखा; सर्पमित्रांची नियुक्ती

पावसाळी अधिवेशनाला सापांचा विळखा; सर्पमित्रांची नियुक्ती

Subscribe

नागपूर येथे पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. १७ दिवसांच्या या अधिवेशनात १३ दिवस प्रत्यक्ष कामकाज चालणार आहे. पावसाचे दिवस असल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने सिव्हिल लाईन्स परिसरातून जाणारा नाला आणि आजुबाजुचा मोकळा परिसर पाहता दहा सर्पमित्रांना जागोजागी तैनात करण्यात केले आहे. गेल्या महिन्याभरापासून विधानभवन परिसर, रविभवन आणि नागभवनाच्या दुरुस्तीचे आणि सुशोभीकरणाचे काम सुरू होते. रविभवन येथे नुतनीकरणाचे काम करत असताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांना दोन साप आढळून आले होते. दोन्हीही साप विषारी असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून चार सर्पमित्रांची नेमणूक करण्यात आली आहे.

मागच्या वर्षीही आमदार निवासात सापाचे दर्शन

मागच्याच वर्षी हिवाळी अधिवेशनादरम्यान समाजवादी पार्टीचे आमदार अबु आझमी यांच्या फ्लॅटवर साप आढळून आला होता. मात्र आता पावसाळा सुरु असल्यामुळे रविभवन, नागभवन आणि मंत्र्यांचा बंगल्याच्या ठिकाणी सापांचा धोका अधिक आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सर्पमित्र नियुक्त केले असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता जनार्दन भानुसे यांनी सांगितले. सर्पमित्र नियुक्त करण्याबाबत स्थानिक वनाधिकाऱ्यांना विनंती केली होती. त्यानुसार आमदार निवास, रविभवन, नागभवन आणि विधानभवन परिसरात चार सर्पमित्र मानधनावर नियुक्त केले आहेत.
आवश्यकता भासल्यास आणखी सर्पमित्रांची गरज पडू शकते, त्यासाठी वन अधिकाऱ्यांकडून शहरातील सर्व सर्पमित्रांची यादी सार्वजनिक बांधकाम विभागाने मागवून ठेवली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -