घरमहाराष्ट्रशरिफ यांच्या घरी बिर्याणी खायला गेलेल्यांनी आमच्यावर टीका करू नये

शरिफ यांच्या घरी बिर्याणी खायला गेलेल्यांनी आमच्यावर टीका करू नये

Subscribe

शरद पवारांनी पाकिस्तानची स्तुती केल्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिकमध्ये केलेल्या आरोपाचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जोरदार खंडन केलं आहे. मोदी उघड खोटे बोलत आहेत. पवारांच्या म्हणण्याच्या अर्थाचा जाणीवपूर्वक अनर्थ काढत नरेंद्र मोदी यांनी तसंच देवेंद्र फडणवीस यांनी लोकांना चिथावणी देण्याचा उद्योग केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला. पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याला जोरदार हरकत घेत मलिक यांनी या दोघांनीही आता खोटं बोलण्याचा विडाच उचला असल्याचं म्हटले.

पवार साहेबांचं संपूर्ण भाषण तपासून पाहा. त्यांच्या वक्तव्यात पंतप्रधान म्हणतात त्याप्रमाणे पाकिस्तानची स्तुती असेल तर आम्ही राजकारण सोडू, असं आव्हानही त्यांनी भाजपला दिलं. निवडणुका डोळ्यापुढे ठेवून ही खोटे बोली सुरू असल्याचं मलिक म्हणाले. मलिक पुढे म्हणाले, पाकिस्तानी लष्कर आणि सरकार यांची भूमिका ही भारत विरोधी आहे. पण तिथले सामान्य नागरिक हे भारताचा व्देष करणारे नाहीत, असं शरद पवार म्हणाले होते.

- Advertisement -

त्याचा चुकीचा अर्थ घेण्यात येत आहे असंही त्यांनी सांगितलं. भाजपच्या नेत्यांना खोटं बोलण्याचा रोग जडलाय. खोटं बोल पण रेटून बोल, अशीच त्यांची एकूणच देहबोली असते. पवार साहेबांच्या बोलण्याचा जाणीवपूर्वक अर्थ बदलण्यात आला आणि त्यांच्या तोंडी पाकिस्तानवर स्तुती टाकण्यात आल्याचा आक्षेप मलिक यांनी नोंदवला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -