घरमहाराष्ट्रसोलापुरात पोलिसांच्या हाती लागले मृतदेहाचे तुकडे केलेले पोते  

सोलापुरात पोलिसांच्या हाती लागले मृतदेहाचे तुकडे केलेले पोते  

Subscribe

सोलापूर येथे वकिलाचा शोध घेत असताना एका पोत्यात मृतदेहाचे तुकडे असल्याचे आढळून आले आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

सोलापूर येथे एक वकिल बेपत्ता झाले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांचा शोध घेतला जात असताना पोलिसांना एका ठिकाणी मृतदेहाचे तुकडे केलेले पोते सापडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या पाठीमागे असलेल्या पांडूरंग वस्ती येथे हे मृतदेहाचे बारीक-बारीक तुकडे केलेले पोते आढळून आले आहे. गेल्या काही दिवसांपासून गायब असलेल्या एका वकिलाचा शोध घेताना पोलिसांच्या हाती हे पोते लागले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही घटना बुधवारी सकाळी साडे बाराच्या सुमारास उघडकीस आली़.

नेमके काय घडले?

सोलापूर येथे गेल्या अनेक दिवसांपासून अ‍ॅड. राजेश कांबळे हे बेपत्ता होते. अनेक दिवसांपासून त्यांचा शोध सुरु असताना पांडूरंग वस्ती येथे एक पोते आढळून आले असून एका व्यक्तीचे गेल्या पाच दिवसांपासून घर बंद असल्याचे आढळून आले आहे. घरातून दुर्गंधी येत असतानाही आजुबाजुच्या लोकांनी याबाबत कुठलेही तक्रार पोलिसांकडे केली नाही. दरम्यान, मंगळवारी अ‍ॅड. राजेश कांबळे हे गायब असल्याची तक्रार सोलापूर बार असोसिएशनच्या वतीने सोलापूर आयुक्तालयात देण्यात आली. या तक्रारीवरून पोलिसांनी बुधवारी सकाळी बाराच्या सुमारास पांडूरंग वस्ती येथील बंटी खरटमल याच्या घरी भेट दिली. यावेळी सदर बझार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र बहिरट यांनी घराची संपूर्ण पाहणी केली असता, घरात प्रेताचे तुकडे भरून ठेवलेले पोते आढळून आले आहे. पोलिसांनी पोत्यात ठेवलेले प्रेत ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी सोलापूरच्या शासकीय रूग्णालयात पाठविले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – बिल मागितले म्हणून हॉटेल मालकावर हल्ला,दोघांना अटक

हेही वाचा – रेल्वे प्रवाशांचे महागडे फोन चोरणाऱ्या सराईत चोरट्याला अटक

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -