घरमहाराष्ट्रसोलापुरातील फटाके निर्मिती कारखान्यात स्फोट

सोलापुरातील फटाके निर्मिती कारखान्यात स्फोट

Subscribe

सोलापूर मधील एका फटाके निर्मित कारखान्यात आज सकाली स्फोट झाल्याची घटना घडली आहे.

सोलापूर मधील एका फटाके निर्मित कारखान्यात स्फोट झाल्याची घटना आज सकाळी घडली आहे. सोलापूरमधील मंगळवेढा तालुक्यातील भाळवणी गावातील प्रशासनाने सील केलेल्या फटाक्याच्या कारखान्यात स्फोट झाल्याने खळबळ उडाली आहे. अचानक सकाळच्या वेळेस कारखान्यातून स्फोट होण्यास सुरुवात झाली आणि संपूर्ण परिसरात घबराट पसरली.

कारखाना करण्यात आला सील

मंगळवेढा तालुक्यातील भाळवणी गावात फटाके निर्मिती कारखाना आहे. या कारखान्यातून आज सकाळी ९ वाजता स्फोट होण्यास सुरुवात झाली. फटाक्यांचे आवाज आणि धुराने परिसर व्यापून गेला होता. तसेच कारखाना सील असताना देखील स्फोट झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. तसेच काही दिवसांपूर्वी देखील या कारखान्यात स्फोट झाले होते. त्यानंतर प्रशासनाने कारवाई करत कारखाना सील केला. मात्र, कारखान सील असून देखील आज सकाळी या कारखान्यात स्फोट झाले.

- Advertisement -

हेही वाचा – नंदुरबार रेल्वे स्थानकावर दगडफेक; पोलीस कर्मचारी जखमी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -