घरमहाराष्ट्रलोकसभा निवडणुक २०१९ : दुसऱ्या टप्प्यात देशभरात ६१. १२ टक्के मतदान

लोकसभा निवडणुक २०१९ : दुसऱ्या टप्प्यात देशभरात ६१. १२ टक्के मतदान

Subscribe

महाराष्ट्रातील १० मतदारसंघात १७९ उमेदवारांचे भवितव्य इव्हीएममध्ये आज बंद होणार आहे.

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. १३ राज्यातील ९७ लोकसभा मतदारसंघामध्ये आज मतदान होत आहे. विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर या १० मतदारसंघांत मतदान होणार आहे. राज्यातील सर्व मतदारसंघामध्ये सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. संध्याकाळी ६ वाजेपर्यंत सर्वांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.  महाराष्ट्रातील १० मतदारसंघात १७९ उमेदवारांचे भवितव्य इव्हीएममध्ये आज बंद होणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर, शिवसेनेचे विद्यमान खासदार आनंद अडसूळ, भाजपच्या विद्यमान खासदार प्रीतम मुंडे या दिग्गज उमेदवारांसह १७९ उमेदवारांचे आज राजकीय भवितव्य आज ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -