घरमहाराष्ट्रअजब! केक कापण्यासाठी भाड्याने मिळतात 'तलवारी'

अजब! केक कापण्यासाठी भाड्याने मिळतात ‘तलवारी’

Subscribe

सोलापूर पोलिसांनी अशाप्रकारे तलवारी भाड्याने देण्याचा व्यवस्याय करणाऱ्या तिघांना अटक केली आहे. 

अनेक पुढाऱ्यांनी, बड्या अधिकाऱ्यांनी किंवा गुंडगिरी क्षेत्रातील ‘भाई’ लोकांनी वाढदिवसाला तलवारीने केक कापल्याचे अनेक व्हिडिओ आजवर समोर आले आहेत. ‘सैराट’ तसंच ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटांमध्येही तलवारीने केक कापण्याचा असाच प्रसंग दाखवण्यात आला आहे. आपली ताकद आणि पैशाचा बडेजाव दाखवण्यासाठी बहुधा हा अजब प्रकार केला जात असावा. दरम्यान, तलवारीने केक कापण्याचं हे फॅड आता सोलापुरातही वाढत आहे. इतकंच नाही तर सोलापुरात वाढदिवसाचा केक कापण्यासाठी भाड्याने तलवारी पुरवण्याचा व्यवसाय केला जात असल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी तपास करुन अखेर सोलापूर पोलिसांनी अशाप्रकारे तलवारी भाड्याने देण्याचा व्यवस्याय करणाऱ्या तिघांना अटक केली आहे.

घटना सविस्तर…

शहराती इंदिरानगर झोपडपट्टी परिसरात तीनजण एका पोत्यात तलवारी बांधून निघाल्याची माहिती मिळताच, शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून त्या तिघा संशयितांना ताब्यात घेतलं. सागर संतोष गुजले, गेनसिद्ध सिद्धाराम चाबूकस्वार आणि सचिन शरणप्पा कोळी या तिघांजवळून पोलिसांनी यावेळी दोन तलवारी जप्त केल्या. त्यांच्यापैकी सचिन गुजले याने ‘आपण वाढदिवसाचा केक कापण्यासाठी भाड्याने तलवारी पुरवतो’, असं पोलिसांना सांगितलं. याच कामासाठी आम्ही या दोन तलवारी घेऊन जात असल्याचीही कबुली त्यांनी दिली. दरम्यान, या तिघांवरही सदर बझार पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

दोन महिन्यांपूर्वी सोलापुरमधील जुन्या एम्प्लॉयमेंट चौकाजवळ भर रस्त्यात, रात्रीच्यावेळी काही तरुण वाढदिवसाचा केक कापताना चक्क तलवारी हातात घेऊन नाचत होते. यामुळे सदर परिसरात काही केळ ट्रॅफिक जामची परिस्थिती उद्भवली होती. अशातच शहरामध्ये केक कापण्यासाठी भाड्याने तलवारी पुरवल्या जातात, हे वृत्त पाहून सोलापूरकर चकित झाले असणार हे नक्की.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -