घरमहाराष्ट्रआईच्या अंत्यसंस्काराच्या ठिकाणी तरुणाने केली आत्महत्या

आईच्या अंत्यसंस्काराच्या ठिकाणी तरुणाने केली आत्महत्या

Subscribe

गजानन यांची दोन लग्न झाली होती. कौटुंबिक वाद वाढत असतानाच त्याच्या आईचा मृत्यू झाला. आईच्या जाण्यामुळे गजानन नैराश्येत आला आणि त्याने शेवटी आत्महत्या केली.

लातूरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. आईच्या मृत्यूचे दु:ख सहन न झाल्यामुळे एका तरुणाने आईच्या अंत्यसंस्काराच्या ठिकाणीच आत्महत्या केली आहे. लातूर जिल्ह्यातल्या शिरुर ताजबंद शिवारात ही घटना घडली आहे. गजानन कोडलवाडे असं या २७ वर्षाच्या आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. गजानन कोडलवाडे यांच्या आईचा मृत्यू ३ दिवसापूर्वी झाला होता. त्यांच्यावर शेतामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले होते. ज्याठिकाणी गजानन याच्या आईवर अंत्यसंस्कार करण्यात आले होते त्याच ठिकाणी गजानन याने स्कॉर्पिओ गाडीत पेटवून घेऊन आत्महत्या केली आहे.

गजानन याने आईवर शेतातील ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्याठिकाणी गजानन काल रात्री आईच्या अंत्यसंस्काराच्या ठिकाणी गाडी घेऊन गेला. त्यानंतर त्याने गाडीवर डिझेल टाकले. त्यागाडीमध्ये स्वत: बसला आणि त्यानंतर गाजी पेटवून दिली. यामध्ये स्कार्पिओ गाडी जळून खाक झाली. गजाननने रात्रीच्या वेळी हे कृत्य केल्यामुळे कोणालाच काही माहिती पडले नाही. गजानन यांची दोन लग्न झाली होती. कौटुंबिक वाद वाढत असतानाच त्याच्या आईचा मृत्यू झाला. आईच्या जाण्यामुळे गजानन नैराश्येत आला आणि त्याने शेवटी आत्महत्या केली. याप्रकरणी अहमदपूर पोलीस तपास करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -