घरताज्या घडामोडीपुणे : संतापलेल्या मुलांने केला पित्याचा खून

पुणे : संतापलेल्या मुलांने केला पित्याचा खून

Subscribe

आईला सातत्याने मारहाण करणाऱ्या मुलांनीच वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. याप्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

नवरा – बायकोचे घरगुती भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या मुलानेच जन्मदात्या पित्याचा खून केल्याची धक्कादायक पुण्यात घडली आहे. संतापलेल्या मुलांने वडिलांच्या डोक्यात लाकडी फळी घालून पित्याची हत्या केली आहे. याप्रकरणी आरोपी विराज येळवंडे (१९) याला अटक करण्यात आली आहे.

नेमके काय घडले?

पुण्यातील देहू गाव येथील माळवाडी येथे येळवंडे हा कुटुंब राहते. या घरातील संतोष येळवंडे (४७) यांना दारुचे व्यसन होते. ते दररोज व्यसनापायी घरात भांडणे करायचे. तसेच पत्नीला सतत मारहाण करायचे. या सगळ्यामुळे त्यांचा मुलगा विराज येळवंडे वैतागला होता. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास पुन्हा एकदा नवरा – बायकोमध्ये किरोकोळ भांडण झाले. हे भांडण सोडवण्यासाठी विराजमध्ये पडला. परंतु वडिलांकडून आईला मारहाण पाहून विराजने रागाच्या भरात शेजारी पडलेल्या लाकडी फळी वडिलांच्या डोक्यात घातली. या मारहाणीत संतोष येळवंडे रक्तबंबाळ झाले. त्यांना शेजाऱ्यांनी तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्या मृत घोषित केले.

- Advertisement -

हेही वाचा – पूर्व उपनगरात आज १५ % पाणी कपात


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -