घरमहाराष्ट्रआईला बाहेर काढणाऱ्या मुलालाच हकलले घराबाहेर

आईला बाहेर काढणाऱ्या मुलालाच हकलले घराबाहेर

Subscribe

अकोला येथे आईला घराच्या बाहेर काढणाऱ्या मुलालाच घराबाहेर काढून त्या घराचा ताबा आईला देण्याचा महत्वपूर्ण आदेश एसडीओ संजय खडसे यांनी दिला आहे.

आई-वडिलांच्या हक्काचे घर असले तरी वंशाचा दिवा ठरणारा मुलगा आई-वडिलांचे वय झाले का घराबाहेर काढतो. घर आपल्याला मिळावे याकरता बऱ्याचदा मुलगाकडून आई-वडिलांचा छळ देखील केला जातो. मात्र अशा घटनांना आळा बसावा याकरता आता अकोला जिल्ह्यामध्ये एक महत्तवपूर्ण आदेश काढण्यात आला आहे. आईला घराच्या बाहेर काढणाऱ्या मुलालाच घराबाहेर काढून त्या घराचा ताबा आईला देण्याचा महत्वपूर्ण आदेश एसडीओ संजय खडसे यांनी गुरुवारी दिला आहे. आई वडिलांचा, जेष्ठ नागरिकांचा निर्वाह आणि कल्याण अधिनियम-२००७ नुसार हा आदेश देण्यात आला आहे.

का देण्यात आला हा आदेश

मलकापूर गावातील वयोवृद्ध पुष्पलता राम सांगोले यांना त्यांच्या हक्काच्या घरातून त्यांच्या मुलाने घराबाहेर काढले होते. अशा अनेक घटना घडत असल्याचे समोर आल्यानंतर हा आदेश काढण्यात आला आहे.

- Advertisement -

काय लिहीलेले होते अर्जात

वयोवृद्ध पुष्पलता राम सांगोले यांना त्यांचा मुलगा भूषण यांने घरातूनबाहेर काढले असल्याचा अर्ज उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांच्याकडे केला होता. या अर्जात आपल्या मुलाने आपल्याला ठार मारण्याची धमकी दिली असल्यामुळे मी माझ्या घरातून बाहेर पडली असून स्वत:चे घर असताना देखील मला भाड्याने राहावे लागत असल्याचे या अर्जात सांगण्यात आले होते. या प्रकरणाची सुनावणी उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांनी घेऊन दोघांचीही बाजू ऐकून घेतल्यानंतर वृद्ध मातेला तिच्या हक्काच्या घरावर ताबा देण्याचा आदेश दिला. त्यामुळे सुरवातीला पोटच्या मुलाने घराबाहेर काढले पण एसडीओ खडसे यांनी दिलेल्या महत्वपूर्ण आदेशामुळे आता मुलाला घराबाहेर राहण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे संजय खडसे यांची बदली झाल्याने हा अकोल्यातील त्यांचा शेवटचा आदेश ठरला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -