घरताज्या घडामोडी...आणि सोनू सूदला राज्यपालांनी बोलावले भेटायला

…आणि सोनू सूदला राज्यपालांनी बोलावले भेटायला

Subscribe

प्रसिद्ध अभिनेता सोनू सूद याचे सर्व स्तरातून कौतुक केले जात असताना चक्क राज्यपालांनी देखील त्याचे कौतुक केले आहे.

राज्या राज्यात कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि लॉकडाऊन यामुळे मजुरांचे प्रचंड हाल झाले आहेत. दरम्यान, या स्थलांतरित मजुरांसाठी देवदूत बनलेला प्रसिद्ध अभिनेता सोनू सूद याचे सर्व स्तरातून कौतुक केले जात असताना त्याला चक्क राज्यपालांनी देखील भेटायला बोलावले होते. सोनू सूद यांनी शनिवारी राज्यपाल भगरतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान राज्यपालांनी सोनू सूदच्या कामाचे कौतुक केले आहे.

अभिनेता सोनू सूद गेल्या कित्येक दिवसांपासून विविध मार्गाने मजुरांची मदत करत आहे. त्याचप्रमाणे स्थलांतरित लोकांना त्यांच्या मूळ राज्यात पोहचविण्यासाठी तसेच लाखो लोकांच्या भोजन व्यवस्थेसाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांची सूद यांनी राज्यपालांना माहिती दिली,’ असे ट्विट राज्यपालांनी केले.

- Advertisement -

सोनू सूद बनला ‘देवदूत’

अनेकांना जेवण पुरविण्यासोबतच त्यांनी गावी पायी चालत जाणाऱ्यांसाठी बसची सोय केली आहे. सोनूने महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारकडून रितसर परवानगी घेऊन मजुरांना त्यांच्या गावी पोहचविण्याची व्यवस्था केली आहे. विशेष म्हणजे खुद्द सोनू प्रत्येक मजुराला निरोप देण्यासाठी जात आहे. तर त्याने आतापर्यंत अनेक मजुरांच्या जेवणाची सोय केली आहे. तसेच त्याचे काही हॉटेल्स देखील डॉक्टर, नर्स यांच्यासाठी खुले केले आहेत.


हेही वाचा – सलमानचा नवा शो ‘हाऊस ऑफ भाईजान’, सांगणार सिक्रेटस, लुलीयाही दिसेल शो मध्ये!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -