घरमहाराष्ट्रधुळ्यात कंटेनर-एसटी बसचा भीषण अपघात; चालकासह १५ जणांचा मृत्यू

धुळ्यात कंटेनर-एसटी बसचा भीषण अपघात; चालकासह १५ जणांचा मृत्यू

Subscribe

अपघातात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

धुळ्याच्या शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा आणि निमगुळ या मार्गावर कंटनेर आणि औरंगाबाद-शहादा या एसटीचा भीषण अपघात झाला. हा अपघात रविवारी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास झाला. या अपघातामध्ये एसटी बस चालक मुकेश पाटील याच्यासह १५ प्रवाशांचा मृत्यू झाला असून २० प्रवासी जखमी आहेत. भरधाव कंटेनरने एसटी बसला जोरदार धडक दिली. यामध्ये एसटी बसच्या समोरील भागाचा अक्षरश: चक्काचूर झाला. अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे तात्काळ मदत म्हणून १० हजार रुपये तर जखमींना प्रत्येकी एक हजार रुपये देण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे. पंचनामा केल्यानंतर नियमानुसार निधी घोषित करण्यात येईल

- Advertisement -

कंटेनरच्या धडकेत बस कापली गेल्याने १५ प्रवाशांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये बसचालक आणि कंटेनर चालकाचाही समावेश आहे. सर्व मृत प्रवासी शहादा तालुका आणि शहरातील रहिवाशी आहेत. अपघाताची माहिती मिळताच जवळपास असलेल्या लोकांनी मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली.

जखमींमधील काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचा मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवली जात आहे. अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना तात्काळ वैद्यकीय मदत मिळावी यासाठी ग्रामस्थांनी रिक्षा, कार, रुग्णवाहिका मिळेल ते वाहन अपघातस्थळी घेऊन जावे, असे आवाहन मंत्री जयकुमार रावल यांनी केले होते.

- Advertisement -

मृत प्रवाशांची नावे

प्रेरणा श्रीराम वंजारी- शहादा
बागवान शकिल महमंद – शहादा
इंद्रीस नासिर मन्यार – तळोदा
मुकेश पाटील (एसटी बस चालक)- शहादा
हस्तीक आनंदराव चौराळ – ठाणे
वृशाली दिपक भावसार – शहादा
मनिषा महेश बागल – निमगूळ
संजय ताराचंद अलकारी – शिरूड

गंभीर जखमी प्रवाशांची नावे

साकिल शकिला पिंजारी – शहादा
मुमताज इम्रान इसाणी – शहादा
हेमंत वसंत देशपांडे – शहादा
सागर पांडुरंग वाघमोळे – धुळे
रईस आब्बास पिंजारी- धुळे
शेख अरूण शेख दगडू – धुळे

दुःखापत झालेल्या प्रवाशांची नावे

मितला नूरला पावरा
सूरज प्रताप परदेशी – धुळे
इम्रान रशिद इसाणी- शहादा
कांतीलाल अलकारी – शिरूड

अशी घडली घटना

शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा ते निमगुळ मार्गावर औरंगाबादकडून शहादाकडे जाणारी एमएच २० बीएल ३७५६ क्रमांकाची बस आणि कंटेनर यांच्यात भीषण अपघात झाला. अपघाताची ही घटना रविवारी रात्री साडेदहा वाजेदरम्यान निमगुळपासून साधारण ३ किमी अंतरावर घडली. शहादा आगाराचे बसचालक मुकेश पाटील हे जागीच ठार झाले आहेत. बसमधील जखमी झालेल्या २० प्रवासींना तत्काळ मदत करून रुग्णवाहिकेच्या सहाय्याने दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघाताताची माहिती मिळताच जखमींच्या मदतीसाठी निमगुळ ग्रामस्थांनी धाव घेतली. तसेच, राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी आवश्यक असणारे मदतकार्य वेगात सुरू झाले. सदर अपघातात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -