घरमहाराष्ट्रएसटीच्या ऑनलाईन आरक्षणाचा उडाला फज्जा!

एसटीच्या ऑनलाईन आरक्षणाचा उडाला फज्जा!

Subscribe

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गौरी-गणपती उत्सवासाठी गावी जाणार्‍या चाकरमान्यांना दिलासा देण्याकरता परिवहन मंत्र्यांनी ३ हजार एसटी बसेसची घोषणा केली. मात्र बुधवारी त्याची अमलंबजावणी करताना एसटी महामंडळाची तारांबळ उडाली. एसटीचे ऑनलाईन तिकीटांचे आरक्षण मध्यरात्रीपासून सुरु होईल असे जाहीर करण्यात आले होते. मात्र महामंडळाच्या अधिकृत संस्केतस्थळावर सकाळपासून तांत्रिक अडचणी येत असल्याने अनेकांना तिकीटांचे आरक्षण करता आले नाही. दुपारी १ वाजाताच्या नंतर तांत्रिक अडचणी दूर करण्यात आल्या. मात्र यामुळे चाकरमान्यांची चांगलीच गैरसोय झालेली आहे.

यंदा गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी रेल्वेची आणि एसटीची विशेष सोय अद्याप सुरु झालेली नव्हती. त्यामुळे सरकारच्या निर्णयाकडे लाखो गणेशभक्तांचं लक्ष लागलं होतं. मात्र, अनेकांना तिकीटांचे आरक्षण करतेवेळी ओटीपी येत नव्हता, तर कधी संकेतस्थळावर बसेस उपल्बध नाहीत असे नोटिफिकेशन दाखवत होते. त्यामुळे त्रस्त झालेल्या चाकरमान्यांनी एसटीचे डेपो गाठले. दुपारी १ वाजेपर्यंत ही तांत्रिक अडचण दूर करण्यात आली. याबाबत एसटीच्या अधिकार्‍यांना विचारणा केली असता, एसटी महामंडळाला कोकणात बसेस सोडण्याच्या नियोजनासाठी खूप कमी कालावधी मिळाला आहे. हा गोंधळ सकाळी झाला आहे. कारण गेल्या चार महिन्यांपासून मुंबई, ठाणे आणि पालघर विभागाची वाहतूक सोडून राज्यभरातील एसटी बंद होती. एसटीचे आरक्षण घेणेसुध्दा बंद होते. मात्र आता प्रवाशांना तिकीट आरक्षित करता येत आहेत.

- Advertisement -

२२ बसेस आरक्षणासाठी सज्ज

दरम्यान, बुधवारी मुंबई विभागातून १०, ठाणे विभागातून ८ आणि पालघर विभागातून ४, अशा एकूण २२ एसटीच्या बसेस आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. राजापूर, मालवण, देवगड, देवरुख, लांजा, गुहागर, खेड, दापोली, रत्नागिरी, चिपळूणसाठी बसेस सोडण्यात येणार आहेत. तसेच प्रत्येक दिवशी प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन बस फेर्‍यांची संख्या वाढविण्यात येणार आहे, अशी माहिती एसटी महामंडळाच्या वरीष्ठ अधिकार्‍यांनी दिली आहे.

असे आहेत मार्ग

कुर्ला – नेहरूनगर ते राजापूर संध्या ६.००, तिकीट रू. ५८०
कुर्ला – नेहरूनगर ते मालवण संध्या ४.००, तिकीट रु. ७३०
कुर्ला – नेहरूनगर ते देवगड संध्या ५.००, तिकीट रु. ७१०
परेल ते देवरूख रात्री ९.००, तिकीट रु.४८०
परेल – लांजा संध्या ७.००, तिकीट रु ५५०
परेल – गुहागर रात्री १०.००, तिकीट रु ४७०
मुंबई सेंट्रल ते खेड रात्री ११.००, तिकीट रु ३५०
मुंबई सेंट्रल ते दापोली रात्री ११.००, तिकीट रु ३९५
मुंबई सेंट्रल ते रत्नागिरी संध्या ८.००, तिकीट रु ५३५
मुंबई सेंट्रल ते चिपळूण रात्री १०.३०, तिकीट रु ४००
नालासोपारा ते गुहागर संध्या ७.३०, तिकीट रु ५३५
नालासोपारा ते दापोली रात्री ८.३०, तिकीट रु ३४५
अर्नाळा ते दापोली संध्या ७.३०, तिकीट रु ३६०
वसई ते चिपळूण संध्या ८.००, तिकीट रु ३९०

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -