वारकरी संप्रदायासाठी खुशखबर!

एसटी महामंडळाच्यावतीने वारकरी संप्रदायासाठी भव्य असे यात्री निवास आणि सुसज्य असे बसस्थानक बांधण्यात येणार आहे.

Pandharpur
ST coperation build up new bus stop and tourist resident for warkari
वारकरी संप्रदायासाठी खुशखबर!

संताचे आणि वारकऱ्यांचे माहेरघर असलेल्या पंढरीत एसटी महामंडळाच्यावतीने ३३ कोटी रुपये खर्च करुन भव्य असे यात्री निवास आणि सुसज्य असे बसस्थानक बांधण्यात येणार असून, हे वारकरी संप्रदायाच्या प्रथा, परंपरेला समर्पित करीत असल्याची घोषणा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली आहे. एसटी महामंडळाच्यावतीने बांधण्यात येणाऱ्या यात्री निवास आणि बसस्थानकाचा भुमिपूजन सोहळा संत नामदेवांचे वंशज ह.भ.प. माधव महाराज नामदास, संत एकनाथांचे वंशज ह.भ.प. रावसाहेब गोसावी महाराज आणि संत तुकारामांचे वंशज ह.भ.प. संजय महाराज देहूकर यांच्या शुभहस्ते करण्यात आला. या सोहळयाप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमास माजी आमदार सुधाकरपंत परिचारक, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष रणजीत सिंह देओल, एसटी महामंडळाचे महाव्यवस्थापक प्रतापसिंह सावंत, मुख्यमंत्री कार्यालयाचे विशेष कार्य अधिकारी श्रीकांत भारती, उपमहाव्यस्थापक राहुल तोरो, सुहास जाधव, विभाग नियंत्रक रमाकांत गायकवाड तसेच महाराज मंडळी उपस्थित होते.

नेमकं काय म्हणाले दिवाकर रावते?

यावेळी दिवाकर रावते म्हणाले की, ‘वारकरी संप्रदाय हा प्रमुख भक्तीचा मार्ग असून, या मार्गाचे आराध्य दैवत पांडूरंग हा अवघ्या महाराष्ट्राचे भक्तीपीठ आहे. वारकरी हा महाराष्ट्राचे संस्कार आणि संस्कृती जपणारा आहे. या संस्काराच्या बळावर पंढरीत येणाऱ्या भाविकांची मोठ्या प्रमाणात संख्या वाढत आहे. येणाऱ्या वारकरी आणि भाविक प्रवाशांना माफक दरात राहण्याची सोय व्हावी, यासाठी एसटी महामंडळाच्या वतीने यात्री निवासाचा उपयोग होणार आहे.’

‘या’ मान्यवरांचा करण्यात आला सत्कार

एसटी महामंडळाने विविध सवलतपात्र प्रवाशांना आधारकार्ड संलग्न स्मार्टकार्ड देण्याचा निर्णय घेतला असून, या स्मार्टकार्डचे औपचारिक वाटप तसेच एसटीच्या विनावातानुकुलीत शयनायन बसचे उदघाटन यावेळी करण्यात आले. यावेळी संत नामदेवांचे वंशज ह.भ.प. माधव महाराज नामदास, संत एकनाथांचे वंशज ह.भ.प. रावसाहेब गोसावी महाराज आणि संत तुकारामांचे वंशज ह.भ.प. संजय महाराज देहूकर आदी महाराज मंडळीचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास मंदीर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगांवकर, महादेव महाराज शिवणीकर, , तनपुरे महाराज , आदीसह राज्याच्या विविध भागातून आलेले भाविक व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here