तोट्यातील एसटीला मालवाहतुकीचा आधार; ३ महिन्यात १० कोटी ३० लाखाची कमाई

अवघ्या तीन महिन्यात राज्यभरात एसटीच्या मालवाहतूक बसेसच्या २१ हजार ११५ फेर्‍यातून १० कोटी ३० लाख रुपयांचा महसूल गोळा केला आहे. त्यामुळे तोट्यातील एसटीला आता मालवाहतुकीतून उत्पन्न मिळाले आहे.

st freight services
एसटी मालवाहतूक सेवा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगभरातील अनेक उद्योग बंद पडले आहेत. काही उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. तसेच राज्यातील एसटी महामंडळाला कोरोना काळात कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. या तोट्यातून बाहेर काढण्यासाठी एसटी महामंडळ मालवाहतूक क्षेत्रात उतरली आहे. अवघ्या तीन महिन्यात राज्यभरात एसटीच्या मालवाहू बसेसच्या २१ हजार ११५ फेर्‍यातून १० कोटी ३० लाख रुपयांचा महसूल गोळा केला आहे. त्यामुळे तोट्यातील एसटीला उत्पन्न या मालवाहतुकीतून मिळाले आहे.

कोरोना महामारीमुळे संपूर्ण जगाचे अर्थचक्र मंदावले आहे. या मंदावलेल्या अर्थचक्राला गती देण्यासाठी उद्योग धडपड करत आहेत. एसटी महामंडळ सुद्धा याच परिस्थितीतून सामोरे जात आहे. गेल्या ७२ वर्ष महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला सुरक्षित आणि किफायतशीर प्रवासी दळणवळणाची सेवा देणारी एसटी आता कोरोना महामारीमुळे आर्थिक दृष्ट्या प्रचंड अडचणीत आली आहे. ५ हजार कोटी रुपये संचित तोटा असणार्‍या एसटीला कोरोना काळात गेल्या पाच महिन्यांमध्ये तिकीट विक्रीतून मिळणार्‍या हक्काच्या ३ हजारास ५०० कोटी रुपयांच्या महसूलावर पाणी सोडावे लागले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात एसटीचा तोटा वाढला आहे. एकूण महसुलाच्या तिकीट विक्रीच्या माध्यमातून ९८ टक्के महसूल एसटीला प्राप्त होतो. परंतु, सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांचा ओघ कमी असल्यामुळे केवळ १० टक्के वाहतूक सुरू आहे. यातून दररोज सुमारे ३.५ कोटी रुपयांचा महसूल मिळत आहे. त्यामुळे या परिस्थिती लक्षात घेता तिकीट विक्री व्यतिरिक्त अन्य महसुलाचे मार्ग एसटीने शोधण्यास सुरुवात केली. २१ मे पासून एसटीने अधिकृतपणे मालवाहतूक व्यवसायात पदार्पण केले. राज्यभरातील एसटीच्या २५० आगार, ६०८ बसस्थानके आणि शेकडो मालवाहतूक वाहने, या मुलभूत भांडवलावर एसटीने आपला मालवाहतूकीचा व्यवसाय विस्तारण्यास सुरूवात केली आहे.

लालपरीची नवी भरारी

सध्या एसटी महामंडळाकडे ७८० मालवाहतूक वाहने तयार आहेत. गेल्या तीन महिन्यात २१ हजार ११५ फेर्‍यांद्वारे १० कोटी ३० लाख रुपयांचे उत्पन्न या मालवाहतूकीतून मिळाले आहे. मे महिन्याच्या २१ तारखेला सुरु झालेला हा व्यवसाय, अल्पावधीतच संपूर्ण राज्यभर पसरला असून मे महिन्यात केवळ ३ लाख रुपये उत्पन्न मिळणार्‍या या व्यवसायाने ऑगस्ट महिन्यात तब्बल ४ कोटी रुपयांचां महसूल मिळवला आहे. त्यामुळे जनसामान्यांची जीवनवाहिनी म्हणून लोकप्रिय असलेली लालपरी आता मालवाहतुकीच्या क्षेत्रातही नवी भरारी घेताना दिसत आहे.

अशी केली कमाई