घरताज्या घडामोडीएसटीचा कारभार 'अतिरिक्त' अधिकाऱ्यांच्या खांद्यावरच!

एसटीचा कारभार ‘अतिरिक्त’ अधिकाऱ्यांच्या खांद्यावरच!

Subscribe

सध्या एसटीमध्ये केवळ ३-४ मोजक्या अधिकाऱ्यांच्या खांद्यावरच पूर्ण एसटीचा डोलारा अवलंबून आहे. गेल्या काही वर्षात सुयोग्य पद्धतीने बढती आणि बदली प्रक्रिया राबवली न गेल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे.

दररोज सुमारे ६६ लाख प्रवाशांना सुरक्षित सेवा देणारी एसटी आता पोरकी झाली आहे की काय? अशी अवस्था निर्माण झाली आहे. कारण , दरवर्षी दहा हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या एसटी कडे अधिकाऱ्यांचा वनवा आहे. एसटीमध्ये केवळ ३-४ मोजक्या अधिकाऱ्यांच्या खांद्यावरच पुर्ण एसटीचा डोलारा अवलंबून आहे .
गेल्या काही वर्षात सुयोग्य पद्धतीने बढती आणि बदली प्रक्रिया राबवली न गेल्यामुळे अधिकाऱ्यांची नवीन फळी निर्माण होऊ शकली नाही.सहाजिकच सध्या काही मोजक्या अधिकाऱ्यांना ‘अतिरिक्त’ पदाचा कार्यभार देऊन एसटीचा गाडा हाकण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात आहे. मुख्य म्हणजे,एसटीचे प्रमुख असलेले व्यवस्थापकीय संचालक हे पद देखील ‘अतिरिक्त’ कार्यभारावर सोपविण्यात आले आहे.

एसटीच्या प्रशासकीय रचनेमध्ये एक अध्यक्ष एक उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक व त्यांना मदत करण्यासाठी ८ महाव्यवस्थापक असतात. सध्या केवळ ३ महाव्यवस्थापक कार्यरत असून , त्यांच्या खांद्यावर त्यांच्या खात्यासह इतर विभागाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. हे अधिकारीदेखील नजीकच्या काळात निवृत्त होत असल्याने, भविष्यात एसटीच्या वरिष्ठ पातळीवर प्रशासना मध्ये अधिकाऱ्यांची मोठी पोकळी निर्माण होणार आहे, हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे.

- Advertisement -

गेल्या काही वर्षांमध्ये नैसर्गिक भरतीप्रक्रिया अथवा जे अधिकारी कार्यक्षम आहेत, त्यांना योग्य पद्धतीने बढती न दिल्याने सध्याची परिस्थिती निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. याचा विपरीत परिणाम एसटीच्या प्रशासकीय कार्यक्षमतेवर होणार असून, भविष्यात करोनाच्या संकटातून उभारी घेण्यासाठी आवश्यक असणारी कार्यक्षमता निर्माण करण्याचे सामर्थ्य सध्याच्या प्रशासकीय यंत्रणेमध्ये नाही, हे कबूल करावे लागेल. त्यातच एसटीची आर्थिक परिस्थिती अत्यंत खालावल्यामुळे करार पद्धतीने घेतलेल्या अनेक अधिकाऱ्यांना ‘नारळ’ दिला जात आहे. त्यामुळे त्यांच्या अनुभवाची देखील कमतरता यावेळी जाणवणे सहाजिकच आहे. परंतु अशा कालावधी मध्येच अनेक होतकरू व कार्यक्षम अधिकार यांच्या खांद्यावर जबाबदारी टाकून त्यांना प्रोत्साहित करणे अत्यंत गरजेचे असून अशा अधिकाऱ्यांची फळी निर्माण करण्याचे मोठे आव्हान एसटीच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्यासमोर उभे ठाकले आहे! त्याला ते कितपत प्रतिसाद देतात, हे येणारा काळच दाखवून देईल.

अशी आहे जबाबदारी

एसटी महामंडळात १ लाख पेक्षा जास्त कर्मचारी, १८ हजार पेक्षा जास्त बस गाड्या आणि ३१ विभाग चालविण्यासाठी एसटी महामंडळाच्या प्रशासकीय यंत्रणेत एक अध्यक्ष एक उपाध्यक्ष आणि त्यांना मदत करण्यासाठी ८ महाव्यवस्थापक असतात. सध्या केवळ तीन महाव्यवस्थापक कार्यरत असून त्यांच्या खांद्यावर त्यांच्या खात्यासह इतर विभागाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. ज्यात महाव्यवस्थापक (कर्मचारीवर्ग) अतिरिक्त, महाव्यवस्थापक (नियोजन) अतिरिक्त, महाव्यवस्थापक (भांडार व खरेदी) अतिरिक्त आणि महाव्यवस्थापक (अपिल) अतिरिक्त समावेश आहे. इतकेच नव्हेतर एसटी महामंडळाचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल यांची बदली झाल्यानंतर संपूर्ण राज्याचा परिवहन विभागाचा भार असलेले परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांना एसटी महामंडळाच्या व्यस्थापकीय संचालक अतिरिक्त भार देण्यात आला आहे. मात्र यावर परिवहन मंत्री लक्ष देताना दिसून येत नाही आहे.

- Advertisement -
  • बसेसची संख्या – १८ हजार ६००
  • कर्मचारी संख्या – १ लाख ३ हजार
  • एसटीचे विभाग – ३१
  • आगार – २५०
  • मार्गस्त बस स्टॉप – ३ हजार

    हेही वाचा – मान्सूनसाठी कोकण रेल्वे सज्ज


Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -