घरमहाराष्ट्रअवैध प्रवासी वाहतूक रोखताना चालकाची मारहाण, एसटी अधिकारी जखमी

अवैध प्रवासी वाहतूक रोखताना चालकाची मारहाण, एसटी अधिकारी जखमी

Subscribe

या मारहाणीमध्ये पाटील यांच्या डाव्या हाताची करंगळी फ्रॅक्चर झाली असून त्यांच्या कानाला टाके घालण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू

मुंबई-पुणे मार्गावर चालत असणाऱ्या खासगी अनाधिकृत वाहनांवर कारवाई करण्याकरिता नियुक्त करण्यात आलेल्या एसटी अधिकाऱ्याला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. सहाय्यक वाहतूक निरीक्षक पाटील यांची दादर येथून मुंबई पुणे मार्गावर धावणाऱ्या बेकायदा वाहनांवर नजर ठेवणे, प्रवाशांना सावध करणे यासारख्या कामासाठी दादरच्या एसटी स्थानकामध्ये नेमणुक करण्यात आली होती.

मंगळवारी आपले कर्तव्य बजावत असताना ज्ञानेश्वर बाबुराव पाटील या एसटी अधिकाऱ्याला जबर मारहाण करण्यात आली. या मारहाणीमध्ये पाटील यांच्या डाव्या हाताची करंगळीला दुखापत होऊन फ्रॅक्चर झाली. तसेच त्याच्या कानाला देखील टाके पडले आहे.

- Advertisement -

असा घडला प्रकार

मंगळवारी दुपारी साधारण साडेचार वाजेच्या सुमारास अवैध असणाऱ्या प्रवासी वाहतूक करत असलेल्या वाहनाने कर्तव्यावर असताना पाठीमागून धडक दिली. ही धडक दिल्यानंतर वाहन चालकाने मारहाण आणि दादागिरीची भाषा सुरू केली. यामध्ये वाहन चालकाची चूक असताना देखील पाटील यांना मारहाण केली.

या मारहाणीमध्ये पाटील यांच्या डाव्या हाताची करंगळी फ्रॅक्चर झाली असून त्यांच्या कानाला टाके घालण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -