घरमहाराष्ट्रदुष्काळात तहानलेल्यांना 'एसटी'चा आधार; ९ जिल्ह्यातील १९ गावात देणार पाणी

दुष्काळात तहानलेल्यांना ‘एसटी’चा आधार; ९ जिल्ह्यातील १९ गावात देणार पाणी

Subscribe

दुष्काळात पाण्यासाठी वणवण फिरणाऱ्या गावकऱ्यांना, आता एसटीच्या माध्यमातून पिण्याचे पाण्याचे टॅंकरद्वारे थेट त्यांच्या गावांमध्ये पोहोचवले जात आहेत.

दुष्काळात पाण्यासाठी वणवण फिरणाऱ्या गावकऱ्यांना, आता एसटीच्या माध्यमातून पिण्याचे पाण्याचे टॅंकरद्वारे थेट त्यांच्या गावांमध्ये पोहोचवले जात आहेत. अन्नदात्या शेतकरी दुष्काळामुळे प्रचंड अडचणीत आहे त्याला मदत करण्याच्या हेतूने. एसटीने पाण्याचे टँकर दररोज सुरू केले आहेत. तब्बल ९ जिल्ह्यातील १९ गावांमध्ये ही योजना सध्या सुरु केली आहे. त्या गावात पाण्याची समस्या संपेपर्यंत हे टँकर सुरू राहणार आहेत. यासाठी येणारा सर्व खर्च उचलला आहे. या उपक्रमाचे सामान्य जनतेकडून कौतुक होत आहे.

एसटी आगारातून, बस स्थानकावरून पाणी पुरवठा

महाराष्ट्र राज्यात तीव्र पाणीटंचाई असल्यामुळे दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झालेली असल्याने सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून राज्य परिवहन महामंडळातर्फे काही दुष्काळग्रस्त गावांना पिण्याचे पाणी टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करणेबाबत निर्णय घेण्यात आला. याची सुरुवात नाशिक जिल्ह्यात सिन्नर तालुक्यातील मनेगाव या दुष्काळी गावातून झाली आहेत. या एसटीच्या पिण्याचे पाण्याचे टॅंकर शुभारंभ ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आले आहेत. यावेळी प्रधान सचिव (परिवहन) आशिष सिंग उपस्थित होते. सर्व सामान्यांची लालपरी नेहमीच सामाजिक जबाबदारी अग्रेसर राहली आहे. दुष्काळग्रस्त गावांना एसटी महामंडळ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा निर्णयाच्या सर्व स्तरातून कौतुक होत आहे. एसटी महामंडळ सद्या ही योजना ९ जिल्ह्यातील १९ गावामध्ये सुरु केली आहे. त्या गावात पाण्याची समस्या संपेपर्यंत हे टँकर सुरू राहणार आहेत. यासाठी एसटी महामंडळाने स्वतःचे पाण्याचे टॅंकरसुद्धा तयार केले आहेत. दुष्काळग्रस्त गावांजवळी एसटीच्या आगारातून किंवा बस स्थानकावरून पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.

- Advertisement -

या गावांचा समावेश 

औरंगाबाद जिल्हातील पेडफाळ, सफियाबाद वाडी आणि हाजीपूर या दुष्काळग्रस्त गावांत एसटीच्या शिरू बस स्थानकांवरील विहिरीतून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यांत येत आहेत.अश्याच प्रकारे नांदेड जिल्हातील जयसिंग तांडा, हेमला तांडा, खडकपूर तर परभणी जिल्हातील सावळी उस्मानाबाद मधील बोरी, मोरडा, कावलदरा, नाशिक मनेगाव, पाटूळे रामनगर आणि सातारा जिल्हातील वावरहिरे, कानकतरे या दुष्काळग्रस्त गांवाच्या समावेश आहेत.

एसटी घेणार दुष्काळग्रस्त गाव दत्तक

एसटी महामंडळाने दुष्काळग्रस्त गावाला दत्तक घेण्याचा सुद्धा निर्णय घेतला आहेत. राज्यात १८० तालुके हे दुष्काळग्रस्त आहेत तर राज्यात एसटीचे ३१ विभाग आहे. या विभागातील दुष्काळग्रस्त गाव निवडण्याचे अधिकार त्या त्या विभाग नियंत्रकांना देण्यात आलेले आहेत. त्यांनी गावाची निवड करून तेथे कर्मचाऱ्यांच्या मदतीने श्रमदान करायचे आहे. वृक्षारोपणासाठी लागणारे काम करायचे आहे. तसेच ज्या डेपोमध्ये पाण्याच्या विहिरी असतील, त्यांनी ते पाणी त्या गावासाठी खुले करायचे आहे किंवा गावातील पाण्याची समस्या सोडवण्यासाठी पाण्याच्या टँकरची सोय करायची आहे. महत्त्वाचे म्हणजे या सर्व कामासाठी लागणारा खर्च एसटी स्वत: करणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -