घरताज्या घडामोडी'एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेत आणि सरसकट द्या'

‘एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेत आणि सरसकट द्या’

Subscribe

एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेत आणि सरसकट देण्याची मागणी महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी केली आहे.

करोना विषाणूमुळे सर्वत्र थैमान घातले आहे. मात्र, या परिस्थितीत एसटी कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य चोख बजावले आहे. अजूनही काही ठिकाणी आवश्यक सेवेसाठी एसटी कर्मचारी काम करत आहेत. एसटी महामंडळाने मागील महिन्याइतके सरसकट वेतन १ आणि ७ एप्रिल रोजी एसटी कर्मचार्यांच्या बँक खात्यावर जमा करावेत, अशी मागणी महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी केली आहे.

देशात आणि राज्यात करोना या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सगळीकडे हाहाकार उडालेला आहे. या परिस्थितीत एसटी कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य चोख बजावले आहे. अजूनही काही ठिकाणी आवश्यक सेवेसाठी एसटी कर्मचारी काम करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात संचारबंदी घोषित केली आहे. त्यामुळे घरातून बाहेर पडता येणे अशक्य झाले आहे. सध्या संचारबंदी असल्याने वेतन बिले तयार करणारे कर्मचारी ही कार्यालयात पोहचू शकत नाही. परिणामी, वेतन वेळेत न होण्याची शक्यता आहे. मात्र, प्रशासनाने मागील महिन्याइतकेच सरसकट वेतन १ आणि ७ एप्रिल रोजी एसटी कर्मचार्यांच्या बँक खात्यावर जमा करावेत आणि तशा प्रकारचे उचित आदेश परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाकडून प्रसारीत व्हावेत, अशी मागणी महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेच्या वतीने केली आहे.

- Advertisement -

परिवहनमंत्री यांना पाठवले पत्र

एकीकडे एसटी महामंडळाचे कर्मचारी आपत्कालीन परिस्थितीत काम करत आहे. त्यांना त्यांचे वेतन गेल्या महिन्या सारखे सरसकट देण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी केली आहे. या संदर्भात परिवहनमंत्री अनिल परब यांना पत्र देण्यात आले आहे.


हेही वाचा – देशापाठोपाठ मुंबईतील सोसायट्यांनीही स्वत:ला केले ‘लॉकडाऊन’

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -