घरमहाराष्ट्रअनर्थ टळला; आदित्य ठाकरेंच्या कार्यक्रमात मंडप कोसळला

अनर्थ टळला; आदित्य ठाकरेंच्या कार्यक्रमात मंडप कोसळला

Subscribe

शिवसेनेच्या युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावरील मोठे अरीष्ट थोडक्यात टळले आहे. शिवशाहू महाविद्यालय, सरुड शाहूवाडी, कोल्हापूर येथील युवतींना स्वंसरक्षणाचे धडे देण्यासाठी आदित्य ठाकरे येथे आले होते. मात्र हा कार्यक्रम सुरु असताना जोरात वाहणाऱ्या वाऱ्यामुळे अचानक मंडप उडाला. मंडपाचे काही खांबही कोसळले गेले. मात्र या गोंधळात मोठा अपघात होता होता टळला. आदित्य ठाकरे सुखरुप असल्याची माहिती मिळत आहे.

युवासेनाप्रमुख Aaditya Thackeray – आदित्य ठाकरे शिवशाहू महाविद्यालय, सरुड शाहूवाडी, कोल्हापूर येथील युवतींना स्वंसरक्षणाचे धडे देत आहेत.

Posted by ShivSena on Tuesday, 18 December 2018

- Advertisement -

 

आदित्य ठाकरे सध्या कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. युवासेनेतर्फे संवाद दौरा आयोजित केलेला आहे. या दौऱ्यानिमित्त कालच त्यांनी शिनोली-चंदगड येथे आरोग्य शिबिराचे उदघाटन केले होते. त्यानंतर महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या कोल्हापूरच्या अंबाबाई देवळात जाऊन काल देवीचे दर्शनही घेतले होते. विविध विकास कामांचे उदघाटने, कार्यकर्त्यांसोबत संवाद असा या दौऱ्याची आखणी केलेली आहे. याचाच भाग म्हणून आज ते शिवशाहू महाविद्यालयात विद्यार्थींनींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठी पोहोचले होते. मात्र हा कार्यक्रम सुरु असताना तिथे जोराचे वारे वाहू लागले आणि त्यामुळेच कार्यक्रमाचा मंडप कोसळला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -