घरमहाराष्ट्रपुण्यात रंगली राज्य मानांकन 'कॅरम' स्पर्धा

पुण्यात रंगली राज्य मानांकन ‘कॅरम’ स्पर्धा

Subscribe

 नगरसेवक संदीप शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त लायन्स क्लब ऑफ तळेगाव इथे या कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

कॅरम असोसिएशन ऑफ पुणे यांच्यातर्फे महाराष्ट्र राज्य मानांकन कॅरम स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत पुरुष एकेरी गटाच्या अंतिम सामन्यात मुंबईचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संदीप देवरूखकरने पुण्याच्या अभिजित त्रिपनकरला २५-९ आणि २५-१७ असे दोन गटात पराभूत करत जेतेपद पटकावले. तर, महिला एकेरी गटाच्या अंतिम फेरीत मुंबईची निलम घोडके विजयी झाली. तिने मुंबईच्याच जान्हवी मोरेवर २४-४, २३-१७ अशी मात केली. निलमचे हे सलग दुसरे विजेतेपद ठरले आहे. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या महिलांच्या लढतीमध्ये मुंबईच्या प्रीती खेडेकरने मुंबईच्या मिताली पिंपळेला १६-१४, २५-४ असे हरवले. तर, पुरुष एकेरीच्या तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीमध्ये प्रशांत मोरे याने पुण्याच्या किरण देंढेवर २५-०,२५-० अशी मात केली. नगरसेवक संदीप शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त लायन्स क्लब ऑफ तळेगाव इथे या कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
आयोजकांसह विजेते स्पर्धक
 पुरुषांच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्यापूर्वी संदीपने विश्व् विजेत्या प्रशांतला तर अभिजीतने किरण देंढेला हरवले. महिलांमध्ये अंतिम फेरी गाठताना जान्हवीने प्रिती खेडेकर तर निलमने मिताली पिंपळेला हरवले होते. विजेत्यांना जवळपस १ लाख १० हजारांची रोख पारितोषिकं आणि चषक देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी तळेगावच्या नगराध्यक्षा चित्राताई जगनाडे, उद्योगपती सुधाकर शेळके व महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे उपाध्यक्ष भारत देसडला हजर होते. त्यांच्याच हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे सचिव अरुण केदार, कॅरम असोसिएशन ऑफ पुणेचे कार्याध्यक्ष आशुतोष धोडमिसे, सचिव नंदू सोनावणे, आयोजन सचिव सुदाम दाभाडे हेदेखील उपस्थित होते.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -