घरमहाराष्ट्रलॉकडाऊन काळात महाराष्ट्रात सायबर गुन्ह्यांमध्ये झपाट्याने वाढ - अनिल देशमुख

लॉकडाऊन काळात महाराष्ट्रात सायबर गुन्ह्यांमध्ये झपाट्याने वाढ – अनिल देशमुख

Subscribe

टिकटॉकच्या माध्यमातून नुकतंच बलात्कार आणि अ‍ॅसिड हल्ल्याला प्रोत्साहित करणारे व्हिडिओ व्हायरल झाले. असे व्हिडिओ पोस्ट करणाऱ्यांवर राज्य सायबर गुन्हे विभाग कठोर कारवाई करेल, असं गृहमंत्र्यांनी सांगितलं.

महाराष्ट्रात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून सायबर गुन्ह्यांची संख्या वाढली आहे. टिकटॉकच्या माध्यमातून नुकतंच बलात्कार आणि अ‍ॅसिड हल्ल्याला प्रोत्साहित करणारे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. असे व्हिडिओ पोस्ट करणाऱ्यांवर राज्य सायबर गुन्हे विभाग कठोर कारवाई करेल, असं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं.

लॉकडाऊन काळात ड्यूटीवर असताना पोलिसांवर हल्ला झाल्याची बर्‍याच बातम्याही समोर आल्या आहेत. पोलिसांवर हल्ला करणाऱ्या ८२३ जणांना अटक करण्यात आलं आहे. आतापर्यंत ४१ आरोग्य अधिकाऱ्यांवर हल्लाकेला आहे. लॉकडाऊन मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन केल्याबद्दल राज्यात आतापर्यंत एकूण २२,५४३ लोकांना ताब्यात घेण्यात आलं आहे, तर ६९,०४६ वाहने जप्त करण्यात आली आहेत. शिवाय, गुन्हेगारांकडून ५ कोटी १९ लाख ६३ हजार ४९७ रुपयांपर्यंत दंड वसूल करण्यात आला आहे.

- Advertisement -

गृहमंत्री अनिल देशमुख यांचा कडक कारवाईचा इशारा | State cyber crime dept will take strict action against says Anil Deshmukh

गृहमंत्री अनिल देशमुख यांचा कडक कारवाईचा इशारा | State cyber crime dept will take strict action against says Anil Deshmukh

Posted by आपलं महानगर – My Mahanagar on Saturday, 23 May 2020

दरम्यान, महाराष्ट्रात दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होत चालली आहे. सरकारने अनेक प्रयत्न करूनही संक्रमित लोकांची संख्या वाढत आहे. राज्यात शुक्रवारी २९४० कोरोना रुग्णांची नोंद झाल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. राज्यात आता संक्रमणाची एकूण संख्या ४४ हजार ५८२ वर पोहोचली आहे. मुंबईत सर्वाधिक रुग्ण असून शुक्रवारी मुंबईत १७५१ नव्या रुग्णांची नोंद झाली.

- Advertisement -

हेही वाचा – स्थलांतरित मजुरांच्या मदतीसाठी पुढे आला सोनू सूद


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -