घरमहाराष्ट्रहल्ल्याची माहिती अर्णब गोस्वामींना तीन दिवस कळतेच कशी?; केंद्रानं उत्तर द्यावं

हल्ल्याची माहिती अर्णब गोस्वामींना तीन दिवस कळतेच कशी?; केंद्रानं उत्तर द्यावं

Subscribe

रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी आणि बार्कचे माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांच्यातील Whats App चॅट समोर आल्याने राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. दरम्यान, आता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणावर केंद्र सरकारला सवाल केले आहेत. बालाकोट आणि पुलावामा हल्ल्याची गोपनीय माहिती जाहीर होणं हे चिंताजनक बाब आहे. पत्रकार अर्णब गोस्वामी यांना या हल्ल्यांची माहिती तीन दिवस आधी कशी काय मिळते? याचं उत्तर केंद्र सरकारने द्यावं, असं अनिल देशमुख म्हणाले. ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते.

गृहमंत्री अनिल देशमुख नागपूर दौऱ्यावर आहेत. आज नागपूर येथे त्यांनी पत्रकार परिषद घेतली. ययावेळी त्यांनी अर्णबच्या Whats App चॅट प्रकरणावर भाष्य करताना हल्ल्याची माहिती अर्णब गोस्वामींना तीन दिवस कळतेच कशी? असा सवाल केला. “२६ फेब्रुवारी २०१९ ला बालाकोटमध्ये हल्ला झाला. अर्णब गोस्वामी यांना २३ तारखेला ही बातमी कळली. त्यांना तीन दिवस आधी ही माहिती कशी मिळाली. हल्ल्याची माहिती केवळ चारपाच महत्त्वाच्या नेत्यांनाच असते. केंद्रीय मंत्र्यांनाही ही माहिती नसते. मग अर्णब यांना ही माहिती कशी मिळाली? हा राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित प्रश्न असून अत्यंत गंभीर बाब आहे. त्यावर केंद्र सरकारने उत्तर दिलं पाहिजे, असं अनिल देशमुख म्हणाले.

- Advertisement -

कायदेशीर सल्ला घेऊन कारवाई करणार

अर्णब गोस्वामी प्रकरणात काही कारवाई करता येईल का? याबाबत आम्ही कायदेशीर मत घेत आहोत. कायदेशीर सल्ला आल्यानंतर कारवाई करण्यात येईल, असं अनिल देशमुख म्हणाले. अर्णब यांच्या चॅटमध्ये अनेक धक्कादायक गोष्टी उघड झाल्या आहेत. बालाकोट हल्ले से चुनाव का वातावरण बदल जायेगा और बडे बॉस को फायदा होगा, असं अर्णब यांनी या चॅटमध्ये म्हटलं आहे, असं अनिल देशमुख म्हणाले.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -