घरताज्या घडामोडीHappy Janmashtami 2020: जन्माष्टमीच्या शुभेच्छा देत साजरा करा 'जन्मोत्सव'!

Happy Janmashtami 2020: जन्माष्टमीच्या शुभेच्छा देत साजरा करा ‘जन्मोत्सव’!

Subscribe

यंदा जन्माष्टमीनिमित्त एकत्र येऊन हा सण साजरा करता येणार नसला तरी आपले नातेवाईक, मित्रमंडळी, प्रियजन यांना डिजिटल माध्यमातून तुम्ही घर बसल्या शुभेच्छा देऊ शकता.

श्रीकृष्णाचा जन्माष्टमी उत्सव हा भारतभर साजरा केला जातो. या सणाला घरोघरी गोडधोड बनवून रात्री १२ वाजता जन्म सोहळा करण्यात येतो. तसेच श्रीकृष्णाच्या पूजेसह पाळणा गायला देखील जातो. तर अनेक ठिकाणी भजन, प्रवचन अशा धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन देखील केले जाते. मात्र यंदा जन्माष्टमीवर कोरोना व्हायरसचे संकट आहे. त्यामुळे हा सण घरगुती स्वरुपात साजरा केला जाणार आहे.

यंदा जन्माष्टमीनिमित्त एकत्र येऊन हा सण साजरा करता येणार नसला तरी आपले नातेवाईक, मित्रमंडळी, प्रियजन यांना डिजिटल माध्यमातून तुम्ही घर बसल्या शुभेच्छा देऊ शकता. त्यासाठी शुभेच्छा संदेश, HD Images, Wishes, Greetings, SMS द्वारा फेसबूक आणि Whatsapp स्टेटस, मेसेजेसच्या द्वारा शेअर करून सेलिब्रेट करा यंदाचा जन्माष्टमीचा सण.

- Advertisement -

राधेची भक्ती, बासरीची गोडी

- Advertisement -

लोण्याचा स्वाद सोबतीला गोपिकांचा रास

मिळून साजरा करू

श्री कृष्ण जन्माष्टमीचा दिवस आज खास

गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!

कृष्ण ज्याचंं नाव

गोकुळ ज्याचंं धाम

अशा श्री भगवान कृष्णाला

आमचा शतश: प्रणाम

गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!

गोकुळमध्ये होता ज्याचा वास

गोपिकांसोबत ज्याने रचला रास

यशोदा, देवकी ज्याची मैय्या

तोच सार्‍यांचा लाडका श्री कृष्ण कन्हैय्या

गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!

दह्यात साखर, साखरेत भात

उंच दहीहंडी उभारुन देऊ एकमेकांना साथ

फोडू हंडी लावून थरावर थर

जोशात साजरा करू आज गोकुळाष्टमीचा सण

श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि गोपाळकाल्याच्या हार्दिक शुभेच्छा!


हेही वाचा – Janmashtami 2020: यंदा बाळगोपाळांसोबत अशी साजरी करा ‘गोकुळष्टमी’


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -