घरमहाराष्ट्रउत्तराच्या गोंधळाने विद्यार्थी बुचकळ्यात लाखो विद्यार्थी पाच गुणांना मुकणार

उत्तराच्या गोंधळाने विद्यार्थी बुचकळ्यात लाखो विद्यार्थी पाच गुणांना मुकणार

Subscribe

करोनामुळे अगोदरच चिंतेत असणार्‍या राज्य शिक्षण मंडळाच्या लाखो विद्यार्थ्यांसमोर आता नवा गुणप्रपंच निर्माण झाला आहे. दहावीच्या सायन्सच्या विद्यार्थ्यांनी बरोबर उत्तरे लिहूनही उत्तर लिहिण्याच्या पद्धतीच्या गोंधळामुळे विद्यार्थ्यांना पाच गुणांना मुकावे लागण्याची वेळ आली आहे. उत्तर लिहिण्याच्या या संभ्रमावस्थेमुळे विज्ञान २ च्या विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. अनेक शिक्षकांनीच आता थेट या विरोधात बोर्डाकडे धाव घेतली असून बोर्ड यासंदर्भात काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

राज्य शिक्षण मंडळाच्या नऊ विभागीय मंडळाच्या लाखो विद्यार्थ्यांची दहावी बोर्डाची परीक्षा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. त्यानुसार १८ मार्च रोजी सायन्स २ ची परीक्षा मुंबईसह इतर बोर्डातही पार पडली आहे. त्यानुसार विज्ञान २ च्या प्रश्न क्रमांक १ मध्ये रिकाम्या जागा भरा हा प्रश्न आहे. या प्रश्नाच्या उत्तरासाठी विद्यार्थ्यांना चार पर्याय देण्यात आले होते. त्यानुसार विद्यार्थ्यांना बरोबर असलेल्या उत्तराचे फक्त पर्याय लिहायचे होते. म्हणजेच जर प्रश्न क्रमांक १ चे उत्तर जर पर्याय क्रमांक ब असेल तर त्यांना उत्तरात फक्त ब असे लिहायचे आहे. तशा स्वरुपाचा निर्णय देखील दुसर्‍या दिवशी झालेल्या मॉडरेटरच्या बैठकीत झाला होता. पण अनेक विद्यार्थ्यांनी उत्तर लिहिताना योग्य पर्यायासमोरील उत्तर लिहिले आहे. त्यामुळे उत्तर बरोबर असूनदेखील या विद्यार्थ्यांना त्या प्रश्नाचे गुण द्यायचे की नाही?

- Advertisement -

असा प्रश्न आता पेपर तपासनिकांसमोर उभा राहिला आहे. मुळात विज्ञान १ आणि विज्ञान २ च्या साठी वेगवेगळे नियम असल्याचे देखील यानिमित्ताने समोर आले आहे. तर पुणे आणि अमरावती या विभागीय मंडळानेदेखील या संदर्भातील योग्य उत्तर लिहलेल्या विद्यार्थ्यांना गुण देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता मुंबई आणि इतर विभागीय मंडळाच्या विद्यार्थ्यांना याचा फटका बसण्याचा शक्यता वर्तविण्यात येत आहे. यासंदर्भात बोलताना मुंबईतील एका विज्ञान शाखेच्या पेपर तपासनिकांनी दिलेल्या माहितीनुसार राज्य शिक्षण मंडळाच्या पेपर झाल्यानंतर लगचेच दुसर्‍या दिवशी मॉडरेटरची बैठक घेतली जाते.

या बैठकीत यासंदर्भातील निर्णय घेण्यात आला आहे. तत्पूर्वी सर्व शाळांना त्यासंदर्भातील सूचना देण्यात आली होती. त्यानुसार अनेक विद्यार्थ्यांनी त्याची अंमलबजावणी केली आहे. पण बर्‍याच विद्यार्थ्यांनी उत्तर लिहिताना फक्त पर्याय क्रमांक न लिहिता, योग्य असलेले उत्तर लिहिले आहेत. त्यामुळे त्याचे गुण दिले जाणार नाहीत. परिणामी उत्तर बरोबर लिहूनदेखील विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसण्याची शक्यता असल्याची भीती या शिक्षकांकडून वर्तविण्यात आली आहे.

- Advertisement -

कोणत्याही विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही. यासंदर्भात माहिती घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल.
– संदीप संगवे, सचिव, मुंबई विभागीय मंडळ अध्यक्ष

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -