घरताज्या घडामोडीउद्योगांनी शासनास सहकार्य करावे - सुभाष देसाई

उद्योगांनी शासनास सहकार्य करावे – सुभाष देसाई

Subscribe

सध्याच्या बिकट परिस्थितीत उद्योगांनी राज्य सरकारला सहकार्य करावे, असे आवाहन महाविकास आघाडी सरकारचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी केले आहे.

करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील उद्योग क्षेत्रासमोर उभ्या ठाकलेल्या संकटाची राज्य सरकारला जाणीव आहे. उद्योग विश्वाला आधार देण्यासाठी आपण व्यापक उपाययोजनांचा आराखडा तयार करीत आहोतच. मात्र, सध्याच्या बिकट परिस्थितीत उद्योगांनी राज्य सरकारला सहकार्य करावे, असे आवाहन महाविकास आघाडी सरकारचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी केले आहे.

राज्य सरकारने अत्यावश्यक बाब म्हणून काही आरोग्य क्षेत्राशी निगडीत काही उद्योगांना सवलती दिलेल्या आहेत. पंरतु, इतर उद्योगांनी सध्याच्या या सवलती मागू नये, असे आवाहनही उद्योगमंत्री देसाई यांनी केले आहे. कोरोना विषाणुच्या संसर्गाने संपूर्ण जगाला विळखा घातला असून महाराष्ट्राही त्याला अपवाद नाही. राज्यात सध्या जवळपास १०० हून कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून शासनाने २३ पासून राज्यात सर्वत्र संचारबंदी लागू केली आहे. संचारबंदीच्या काळात विविध कंपन्या, आस्थापनांवर देखील बंदी घातलेली आहे. परंतु, अत्यावश्यक वस्तुनिर्मितीसह माहिती तंत्रज्ञान व अनुषांगिक सेवा, कृषी व अन्न प्रक्रिया आधारित उद्योग, दाळ आणि राईस मिल, डेअरी युनिट, खाद्य आणि पशुखाद्य उद्योग यांना मात्र सवलत दिलेली आहे. मात्र, इतर उद्योगांनी अनावश्यक परवानगी मागू नये, असे आवाहन देसाई यांनी केले आहे.

- Advertisement -

दरम्यान, उद्योगासंबधी समस्येबाबत समन्वयक म्हणून सचिव प्राजक्ता लवांगरे यांची नियुक्ती केली आहे. याशिवाय मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, उद्योग विभागाचे सचिव वेणुगोपाल रेड्डी, उद्योग विभागाचे विकास आयुक्त हर्षदीप कांबळे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन, यांच्याशी संपर्क साधावा.

एक आवाहन…

आरोग्य विषयक वस्तुंची निर्मिती करणाऱ्या उत्पादकांनी सॅनिटायझर, मास्क यासह इतर आवश्यक वस्तुंचा शासनास पुरवठा करावा. यासोबत फूड इंडस्ट्रिज, रसायने, पाणी, वैद्यकीय उपकरणे, कृषी माल बणविणाऱ्या उद्योगांनीदेखील शासनास सहकार्य करावे, ही विनंती.

- Advertisement -

शासनाला उद्योगांच्या समस्यांची जाणीव

शासनाने आयकर रिटर्न दाखल करण्याची मुदत वाढवून दिली आहे. तसेच आर्थिक नियमांना मुदत वाढ दिलेली आहे. पुढे देखील याबाबत त्रास होणार नाही. शासन आपल्या पाठिशी उभे आहे. आपण देखील शासनाच्या पाठिशी उभे रहावे, असे आवाहन देसाई यांनी केले.


हेही वाचा – जिल्हा रुग्णालयातील तिघांचे रिपोर्ट निगेटिव्ह


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -