घरदेश-विदेशगुड न्यूज : भारतात स्वदेशी कोरोना लसीची प्राण्यांवर यशस्वी चाचणी!

गुड न्यूज : भारतात स्वदेशी कोरोना लसीची प्राण्यांवर यशस्वी चाचणी!

Subscribe

‘भारत बायोटेक’ची घोषणा

जगभर मृत्यूचे तांडव करणार्‍या कोरोनाला रोखण्यासाठी संशोधक जीवाचे रान करत असताना एक चांगली बातमी समोर येत आहे. विशेष म्हणजे जगाला ही बातमी दिलीय ती भारताने. देशात कोरोना संक्रमित रुग्णांच्या संख्येत वाढ होत चालल्याचे दिसून येत असताना ही बातमी दिलासादायक ठरलीय. भारत बायोटेक या कंपनीने कोरोनावर उपचारासाठी ‘कोवॅक्सिन’ ही लस शोधून काढली असून या स्वदेशी लसीचा प्राण्यांवर वापर यशस्वी ठरल्याचे भारत बायोटेककडून जाहीर करण्यात आले आहे.

‘कोवॅक्सिनची प्राण्यांवर झालेल्या चाचणीच्या परिणामांची घोषणा करताना भारत बायोटेकला अभिमान वाटतोय. हा परिणाम लाईव्ह व्हायरल चॅलेंज मॉडेलमध्ये सुरक्षात्मक प्रभाव प्रदर्शित करतो,’ असे ट्विट भारत बायोटेककडून करण्यात आलेय. गैर-मानव सस्तन प्राण्यांवर (उदा. माकड, वटवाघूळ इत्यादी) करण्यात आलेल्या अभ्यासात कोवॅक्सिनच्या रोगप्रतिकारक क्षमतेचा परिणाम दिसून येतो. ‘कोवॅक्सिन’ माकडांमध्ये विषाणूंविरुद्ध लढण्यासाठी अ‍ॅन्टीबॉडीज विकसित करण्यात यशस्वी ठरल्याचेही भारत बायोटेकने स्पष्ट केलेय.

- Advertisement -

भारत बायोटेक आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) मिळून कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी ‘कोवॅक्सिन’ ही लस तयार करत आहेत. स्वदेशी ‘कोवॅक्सिन’ला ‘ड्रग रेग्युलेटरी’कडून (DCGI) चाचणीच्या दुसर्‍या टप्प्याचीही परवानगी देण्यात आलीय.

‘कोवॅक्सिन’ची दुसर्‍या टप्प्यातील चाचणीला येत्या ७ सप्टेंबरपासून सुरुवात झालीय. भारत बायोटेकच्या या लसीचा पहिल्या टप्प्यात देशातील वेगवेगळ्या भागांत परीक्षण करण्यात आलेय. दुसर्‍या टप्प्यासाठी ३८० उमेदवारांवर लसीची चाचणी केली जाणार आहे. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS) दिल्ली आणि पाटणा, विशाखापट्टनममधील किंग जॉर्ज हॉस्पीटल, हैदराबादमधील निजामचं आयुर्विज्ञान संस्था इथे ‘कोवॅक्सिन’च्या दुसर्‍या टप्प्यातील चाचणी पार पडणार आहे. सोबतच रोहतकच्या पीजीआयमध्येही याची चाचणी सुरू आहे.

- Advertisement -

दुसरीकडे, औषध कंपनी ‘एस्ट्राजेनेका’ने इतर देशांत ऑक्सफर्ड कोविड १९ च्या लसीची चाचणी थांबविल्यानंतर भारतीय सीरम संस्थेकडूनही चाचणीला स्थगिती देण्यात आलीय. तसेच पुढच्या आदेशापर्यंत दुसर्‍या आणि तिसर्‍या टप्प्यातील लसीच्या चाचणीसाठी नव्या उमेदवारांची भर्ती रोखण्याचे निर्देश डीसीजीआयने ‘सीरम’ला दिलेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -