घरमहाराष्ट्र'वाघांच्या आंतरराष्ट्रीय तस्करीमध्ये मुनगंटीवारांचा हात'

‘वाघांच्या आंतरराष्ट्रीय तस्करीमध्ये मुनगंटीवारांचा हात’

Subscribe

वाघांच्या आंतरराष्ट्रीय तस्करीमध्ये वनमंत्र्यांचा हात असल्याचा आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांनी केला आहे.

अवनी अर्थात टी-१ वाघिणीला गोळ्या घालून ठार केल्यानंतर मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर हल्ला चढवला आहे. वाघांच्या आंतरराष्ट्रीय तस्करीमध्ये वनमंत्र्यांचा हात असल्याचा आरोप यावेळी निरूपम यांनी केला. दरम्यान, सुधीर मुनगंटीवार वनमंत्री झाल्यानंतर वाघांच्या शिकारीमध्ये वाढ झाल्याचा आरोप देखील निरूपम यांनी केला. आज अवनीचा मृतदेह असता तर त्यातून सत्य बाहेर आले असते. पुरावे नष्ट करण्यासाठीच अवनीला जाळलं गेलं असा आरोप देखील संजय निरूपम यांनी केला. लोक जंगलामध्ये गेले म्हणून त्यांची शिकार झाली. त्यात वाघिणीचा काय? दोष असा सवाल देखील निरूपम यांनी यावेळी केला. मंत्री कोर्टाचा आधार घेऊन आपलं पाप लपवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी केली. २०१५ साली १४, २०१६ साली १६ आणि २०१७ साली २१ वाघ मारले गेले अशी माहिती यावेळी संजय निरूमप यांनी दिली. अवनी वाघिणीला ठार केल्यापासून वनविभागासह वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर देखील टिका होत आहे. केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांनी देखील मुनगंटीवार यांच्यावर टीका करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

वाचा – अवनी शिकार प्रकरण: गडकरींनी केली मुनगंटीवारांची पाठराखण

अवनीबाबत पोस्टमॉर्टममधून धक्कादायक माहिती

२ नोव्हेंबर रोजी अवनी वाघिणीला गोळ्या घालून ठार केल्यानंतर त्याबाबत आता धक्कादायक माहिती पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून समोर आली आहे. अवनी या नरभक्षक असलेल्या वाघिणीला ठार करण्यापूर्वी बेशुद्धीचं इंजेक्शन लागलंच नसल्याचं या अहवालामध्ये म्हटलं आहे. त्यामुळे अवनी वाघिणीच्या मृत्यू प्रकरणावरून मोठा वाद होण्याची शक्यता आहे. अवनी वाघिण नरभक्षक असल्याचं म्हणत तिला यवतमाळच्या जंगलामध्ये २ नोव्हेंबर रोजी गोळ्या घालून ठार करण्यात आलं. यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. अवनी अर्थात टी – १ वाघिणीला ठार करण्यापूर्वी तिला बेशुद्धीचं इंजेक्शन दिलं नसल्याचा आरोप केला जात होता. पण, संबंधित टीमनं मात्र या आरोपांचं खंडन केलं होतं. मात्र आता आलेल्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून तरी बेशुद्धीचं इंजेक्शन लागलं नसल्याचं म्हटल्यानं अवनीला ठार करणारे शिकारी आणि टीम समोरच्या अडचणी वाढल्या आहे. याप्रकरणी प्राणी प्रेमी आणि संघटनांकडून देखील निषेध नोंदवण्यात आला आहे.

वाचा – अवनी वाघीण मृत्यू प्रकरणी चौकशी समिती स्थापन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -