घरमहाराष्ट्रलोकसभा २०१९ : महाराष्ट्रात चार टप्प्यात मतदान

लोकसभा २०१९ : महाराष्ट्रात चार टप्प्यात मतदान

Subscribe

राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त अश्विनीकुमार यांनी मंत्रालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये राज्यात लोकसभेसाठीच्या मतदानाचे टप्पे आणि मतदानाचा कार्यक्रम याविषयी माहिती दिली.

केंद्रीय निवडणूक आयोगाने देशभरातल्या निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्यानंतर राज्यातही निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन राज्यातल्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. दिल्लीतील विज्ञान भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त सुनील अरोरा यांनी लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक सांगितले. यामध्ये महाराष्ट्रात चार टप्प्यांमध्ये होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी मतदान होणार असून सर्व राज्यातील मतमोजणी २३ मे २०१९ रोजी होणार आहे. त्यामुळे देशातल्या उर्वरीत राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रात देखील रविवार अर्थात आजपासूनच आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या परीने कंबर कसून तयारीला सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात ७ जागी मतदान, दुसऱ्या टप्प्यात १० जागी, तिसऱ्या टप्प्यात १४ जागी तर अखेरच्या चौथ्या टप्प्यात १७ जागी मतदान होतील.

आजपासून आचारसंहिता लागू 

देशात ११ एप्रिलपासून १९ मे पर्यंत लोकसभेसाठी मतदान होणार आहे. त्यामध्ये महाराष्ट्रात एकूण चार टप्प्यांमध्ये मतदान होणार असून पहिल्या टप्प्याचं मतदान ११ एप्रिलला, दुसऱ्या टप्प्याचं मतदान १८ एप्रिलला, तिसऱ्या टप्प्याचं मतदान २३ एप्रिलला तर चौथ्या टप्प्याचं मतदान २९ एप्रिलला होणार आहे. २३ मे रोजी संपूर्ण देशभरात मतमोजणी होऊन २०१९मध्ये कोण पंतप्रधानपदाची शपथ घेणार? यावर शिक्कामोर्तब होणार आहे. सर्वच पक्षा आपापल्या परीने तयारीला लागले असून आघाड्या आणि युत्यांची चर्चाही जवळपास अंतिम टप्प्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या तारखांनंतर आचारसंहिता लागू झाल्यामुळे लोकसभा निवडणूक २०१९ची खऱ्या अर्थाने रणधुमाळी सुरू झाली आहे.

- Advertisement -

राज्यातील निवडणुकीचे चित्र 

  • महाराष्ट्रात पहिल्यांदाच ४ टप्प्यांमध्ये मतदान
  • ८ कोटी ७३ लाख ३३ हजार मतदार
  • अपंग मतदारांची संख्या वाढण्यासाठी सुलभ निवडणुका ही योजना – यासाठी अपंग मतदारांच्या नोंदणीसाठी प्रयत्न
  • २०१४पासून अपंग मतदारांमध्ये ६५ लाख मतदारांची संख्या वाढली
  • २०१४मध्ये ८८९ महिला होत्या, आता ते प्रमाण ९९१ झाले आहे
  • २०१४ – ८९ हजार मतदारकेंद्र, २०१९मध्ये ९५ हजार ४७३ मतदारकेंद्र झाली
  • राज्यभरात व्हीव्हीपॅटचा वापर

राज्यात या तारखांना होणार मतदान – 

  • पहिला टप्पा –  ११ एप्रिल –  ७ जागा
  • दुसरा टप्पा – १८ एप्रिल – १० जागा
  • तिसरा टप्पा – २३ एप्रिल – १४ जागा
  • चौथा टप्पा – २९ एप्रिल – १७ जागा

पहिला टप्पा –  २० राज्य – ९१ मतदारसंघ

नोटिफिकेशन – ८ मार्च
अर्जाची शेवटची तारीख – २५ मार्च
अर्जांची छाननी – २६ मार्च
अर्ज मागे घेण्याची तारीख – २६ मार्च
मतदान – ११ एप्रिल
मतमोजणी – २३ मे
निवडणूक पूर्ण होण्याचा काळ – २७ मे

दुसरा टप्पा – १३ राज्य – ९७ मतदारसंघ

नोटिफिकेशन – १९ मार्च
अर्जाची शेवटची तारीख – २६ मार्च
अर्जांची छाननी – २७ मार्च
अर्ज मागे घेण्याची तारीख – २९ मार्च
मतदान – १८ एप्रिल
मतमोजणी – २३ मे
निवडणूक पूर्ण होण्याचा काळ – २७ मे

- Advertisement -

तिसरा टप्पा – २० राज्य – ९१ मतदारसंघ

नोटिफिकेशन – २८ मार्च
अर्जाची शेवटची तारीख – ४ एप्रिल
अर्जांची छाननी – ५ एप्रिल
अर्ज मागे घेण्याची तारीख – ८ एप्रिल
मतदान – २३ एप्रिल
मतमोजणी – २३ मे
निवडणूक पूर्ण होण्याचा काळ – २७ मे

चौथा टप्पा – ९ राज्य – ७१ मतदारसंघ

नोटिफिकेशन – २ एप्रिल
अर्जाची शेवटची तारीख – ४ एप्रिल
अर्जांची छाननी – ५ एप्रिल
अर्ज मागे घेण्याची तारीख – ८ एप्रिल
मतदान – २९ एप्रिल
मतमोजणी – २३ मे
निवडणूक पूर्ण होण्याचा काळ – २७ मे

पाचवा टप्पा – ७ राज्य – ५१ मतदारसंघ

नोटिफिकेशन – १० एप्रिल
मतदान – ६ मे
मतमोजणी – २३ मे
निवडणूक पूर्ण होण्याचा काळ – २७ मे

सहावा टप्पा – ७ राज्य – ५९ मतदारसंघ

नोटिफिकेशन – १६ एप्रिल
मतदान – १२ मे
मतमोजणी – २३ मे
निवडणूक पूर्ण होण्याचा काळ – २७ मे

सातवा टप्पा – ८ राज्य – ५९ मतदारसंघ

नोटिफिकेशन – २२ एप्रिल
मतदान – १९ मे
मतमोजणी – २३ मे
निवडणूक पूर्ण होण्याचा काळ – २७ मे

एका टप्प्यात होणाऱ्या निवडणुका – आन्ध्र प्रदेश, अरूणाचल, गोवा, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, केरळ, मेघालय, मिझोराम, नागालँड, पंजाब, सिक्कीम, तेलंगाणा, तमिळनाडू, उत्तराखंड, अंदमान निकोबार, दादर नगर हवेली, दमण दीव, दिल्ली, पाँडिचेरी, चंदीगड

दोन टप्प्यांमध्ये होणाऱ्या निवडणुका – कर्नाटक, मणिपूर, राजस्थान, त्रिपुरा

तीन टप्प्यांमध्ये होणाऱ्या निवडणुका – आसाम, छत्तीसगड

चार टप्प्यांमध्ये होणाऱ्या निवडणुका – झारखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा

पाच टप्प्यांमध्ये होणाऱ्या निवडणुका – जम्मू-कश्मीर

सहा टप्प्यांमध्ये होणाऱ्या निवडणुका – कोणतंही राज्य नाही

सात टप्प्यांमध्ये होणाऱ्या निवडणुका – बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल

कशी असेल निवडणूक काळातली नियमावली?

राजधानी दिल्लीतील विज्ञान भवनामध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन निवडणुकांच्या तारखांसंदर्भात घोषणा केली. देशात वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. त्यानुसार उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्र प्रदेश अशा मोठ्या राज्यांमध्ये एकाहून अधिक टप्प्यांमध्ये मतदान होणार असून इतर प्रशासकीय दृष्ट्या लहान राज्यांमध्ये एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. देशात यंदा ९० कोटी मतदार असून २०१४च्या तुलनेत त्यात ७ कोटींची भर पडल्याचं यावेळी जाहीर करण्यात आलं. यंदा १० लाख मतदान केंद्र असणार आहेत. सर्व मतदान केंद्रांवर इव्हीएम वापरणार असल्याचं देखील जाहीर करण्यात आलं आहे. त्या त्या ठिकाणी मतदान यंत्र पोहोचली आहेत. मतदारांसाठी १५९० हा टोल फ्री क्रमांक तक्रारीसाठी असेल. यंदा १८ ते १९ वयोगटातील मतदारांची संख्या दीड कोटी असेल. या निवडणुकीत ७१ हजार परदेशातील भारतीय नागरिक मतदान करणार. यंदा इव्हीएम मशीनवर उमेदवाराचा फोटो देखील असणार. त्याशिवाय विरोधकांनी केलेली व्हीव्हीपॅटची मागणी मान्य करण्यात आली असून आपण कुणाला मतदान केलं आहे याचा पुरवा मतदारांना आता मिळणार आहे. स्थानिक पातळीवर गैरप्रकार झाल्याची तक्रार जर कुणी केली, तर त्यासंदर्भात करण्यात आलेल्या कारवाईची बातमी स्थानिक माध्यमांमध्ये देण्यात येईल. जेणेकरून संबंधित प्रकरणात काय कारवाई केली आहे, त्याची माहिती सदर तक्रारकर्त्याला मिळू शकेल. अशी तक्रार करणाऱ्या तक्रारदारांची नावं त्यांची इच्छा असेल तर गुप्त ठेवण्यात येतील. जर उमेदवारांनी आचारसंहितेचं उल्लंघन केलं, तर अशा उमेदवारांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत उमेदवारांना प्रचाराचे लाऊड स्पीकर लावता येणार नाहीत. त्याशिवाय मतदानाच्या ४८ तास आधी लाऊडस्पीकर लावता येणार नाहीत. तसेच उमेदवारांना फॉर्म २६ भरावा लागणार आहे. सोशल मीडियासाठीही आचारसंहिता लागू असेल. गुगल आणि फेसबुकने देखील अशा राजकीय जाहिरातबाजीवर लक्ष ठेवण्याचं आश्वासन दिलं आहे.

पहिला टप्पा

वर्धा, रामटेक, नागपूर, चंद्रपूर, भंडारा-गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ

दुसरा टप्पा

बुलडाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर

तिसरा टप्पा

जळगाव, रावेर, जालना, ओरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी, कोल्हापूर, हातकणंगले

चौथा टप्पा

नंदूरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक,पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मावळ, शिरुर, शिर्डी, मुंबईतल्या सहा जागा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -