मुख्यमंत्र्यांचा प्रशासनावर वचक नाही – सुप्रिया सुळे

राज्यातील वाढत्या महिला अत्याचाराच्या घटना या गंभीर आहेत. मुख्यमंत्र्यांचा प्रशासनावर वचक नसल्यानं या घटना वाढत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

Mumbai
Supriya Sule
खासदार सुप्रिया सुळे

राज्यातील वाढत्या महिला अत्याचाराच्या घटना या गंभीर आहेत. मुख्यमंत्र्यांचा प्रशासनावर वचक नसल्यानं या घटना वाढत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. राज्यामध्ये महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्याची आकडेवारी समोर आल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी थेट मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं आहे. केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये भाजपचीच सत्ता आहे. पण, प्रशासनावर मुख्यमंत्र्यांचा वचक नाही. मुख्यमंत्र्यांकडे गृहखातं आहे. पण, त्यांचा प्रशासनावर वचक नाही. यापूर्वी देखील अनेक मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्रीपदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळलेली आहे. पण, यावेळी राज्याचे मुख्यमंत्री मात्र अपयशी ठरल्याची टीका यावेळी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. यापूर्वी देखील सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलंलं होतं. पण, आता महिला सुरक्षेवरून देखील सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं आहे.

शिवाय, पाच राज्यांच्या निवडणुकीचे निकाल काय लागतील यासाठी थोडी वाट पाहायाला हवी असं देखील सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. एक्झिट पोलवरून यावेळी बोलण्यास तरी त्यांनी थेट नकार दिल्याचं दिसून आलं.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here