सुप्रिया फक्त उत्तम सेल्फी घेऊ शकतात – विजय शिवतारे

सुप्रिया सुळे तुम्ही उत्कृष्ट खासदार सोडा पण उत्कृष्ट सेल्फीपटून नक्की होऊ शकाल. कारण सेल्फी, आरोग्य किंवा जिल्हा परिषदेमध्ये सायकलींचे वाटप करण्यासाठी खासदार होण्याची काहीच गरज नाही.

Mumbai
supriya-sule_Selfie_with_potholes
खडड्यासोबत फोटो घेताना सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळे या उत्तम खासदार नाहीत तर त्या फक्त उत्तम सेल्फी घेऊ शकतात, अशी टीका राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केली आहे. शिवतारे यांनी या संदर्भात सुप्रिया सुळे यांना एक खुले पत्र देखील लिहिले आहे. हे पत्र फेसबुकवर लिहिण्यात आले असून त्यात त्यांनी सुप्रिया सुळेंना चक्क उत्तम ‘सेल्फीपटू’ असे म्हटले आहे. खासदार म्हणून रस्त्यांवरील खड्डयाचा फोटो काढला त्याऐवजी पाठपुरावा केला असता तर बरे झाले असते, पण तुम्ही सेल्फी काढण्यात मग्न राहिलात, अशी टीका त्यांनी सुप्रिया सुळेंवर केली आहे. शिवाय त्यांच्या खासदारकीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

काय म्हटलं आहे खुल्या पत्रात?

सुप्रिया सुळे तुम्ही उत्कृष्ट खासदार सोडा पण उत्कृष्ट सेल्फीपटू नक्की होऊ शकाल. कारण सेल्फी काढण्यासाठी,  आरोग्य किंवा जिल्हा परिषदेमध्ये सायकलींचे वाटप करण्यासाठी खासदार होण्याची काहीच गरज नाही. गणपती मंडळांचे अध्यश्र अशी कामे नित्यनेमाने करत असतात. त्यासाठी खासदारकीची जागा अडवून ठेवण्याची काय गरज? ही कामे पवार चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातूनही करता येऊ शकतात. सेल्फी विथ खडडे हे अभियान राबवले परंतु केंद्रीय रस्ते विकास निधीतून एकही पैसा तुमच्या मतदारसंघात आणू शकला नाहीत यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट कोणती असू शकते.

सेल्फी विथ सुप्रिया सुळेज वर्क्स

पत्रात शिवतारे यांनी सुप्रिया सुळे यांना कळकळीची विनंती केली आहे. त्यात त्यांनी सेल्फी विथ सुप्रिया सुळेज वर्क्ज या नावाने मोहीम राबवावी आणि आपली कामे जनतेला दाखवाच असे आवाहन केले आहे. फेसबुकवर हे पत्र शिवतारे यांनी शेअर केले असून त्यात त्यांनी अनेक विषय मांडले आहेत.

वाचा शिवतारे यांचे सुप्रिया सुळेंना लिहिलेले पत्र 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here