कॉल गर्ल निघाली पत्नी अन्…

दोघांनीही दिला एकमेकांना चोप, भांडत भांडत परतले घरी

Amravati
Wife came as a call girl
कॉल गर्ल निघाली पत्नीच

कॉल गर्लला भेटायला बोलावताय तर सावधान! असं म्हणण्याची वेळ यासाठी आली आहे कारण अमरावतीतील एका जोडप्याला याचा प्रत्यक्षात अनुभव आलाय. एका व्यक्तीने भेटायला बोलावलेली कॉर्ल गर्ल ही त्याची पत्नीच निघाली. एकमेकांच्या समोरासमोर आल्यानंतर या दोघांचं भांड फुटलं. आणि एकमेकांना चोप देत देत घरी परतले.

नेमकं काय घडलं ?

नेमकं घडलं असं की, बुधवारी म्हणजेच २२ जानेवारी या दिवशी पत्नी आपल्या मैत्रीणीचं लग्न असल्याचं सांगून घराबाहेर पडली. घराबाहेर पडताच पतीही झाला खूष. पतीने तात्काळ आपल्या मित्राला कॉल केला. मित्राकडून एका कॉर्ल गर्लचा नंबर मिळवला. आपल्या फोनवरुन कॉर्ल गर्लला संपर्कही केला. त्याच दरम्यान दोघांनी एकमेकांना भेटण्याचं निश्चित केलं. केव्हा, कधी आणि कुठे भेटायचं हे ठरल्यानंतर फोन ठेवला. पण, कॉर्ल गर्लला दिलेला पत्ता माहित नसल्याने तिने पुन्हा कॉल केला. निश्चित पत्त्याबाबत माहिती दिल्यानंतर पतीने एक लँडमार्कही दिला.

काही वेळानंतर दोघेही ठरलेल्या ठिकाणी पोहोचले. गर्दीच्या ठिकाणी एकमेकांना शोधायचं कसं म्हणून एकमेकांना पुन्हा संपर्क केला. तोंडाला स्कार्फ बांधून आलेल्या महिलेपर्यंत पती पोहोचला. महिलेने स्कार्फ सोडला आणि बघतो तर काय ती महिला त्या पतीची पत्नीच निघाली.

एकमेकांसमोर आल्यानंतर दोघांच्याही पायाखालची जमीन सरकली. आपलं भांड फुटलं या भावनेने दोघांनीही एकमेकांवर आक्षेप घ्यायला सुरूवात केली. दोघांमध्ये वाद झाला. आजूबाजूला वाढलेल्या गर्दीला त्यांच्या भांडणातून नेमकं काय घडलंय याचा अंदाज आला होता. बाचाबाचीचे रुपांतर मारहाणीत झालं. पतीने पत्नीचे केस ओढत तिला मारहाण केली. पत्नीने पतीवर हात उचलत कानशिलात लगावली. याच परिस्थितीत पती-पत्नी घराच्या दिशेने निघाले. पण, चालताना ही त्यांची शाब्दिक बाचाबाची सुरू होती. या भांडणाचा मात्र तिथे जमा झालेल्या गर्दीने आनंदच घेतला. कारण, ज्या गोष्टीवरुन त्या दोघांचं भांडण झालं होतं त्या कारणावर कोणाचा विश्वास बसत नव्हता.