घरताज्या घडामोडीठाकरे सरकार आणि मुबंई पोलिसांच्या बदनामीसाठी ८०,००० फेक अकाऊंट उघडले

ठाकरे सरकार आणि मुबंई पोलिसांच्या बदनामीसाठी ८०,००० फेक अकाऊंट उघडले

Subscribe

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर मुंबई पोलिस आणि महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी विविध सोशल मीडिया साईटवर ८० हजार फेक अकाऊंट उघडण्यात आल्याची धक्कादायक माहिती मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी दिली आहे. याबाबत मुंबई सायबर सेल पुढील तपास करत असून Information Technology Act नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुशांत सिंह राजपूत आत्महत्येनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. विरोधकांनी महाविकास आघाडी सरकार आणि मुंबई पोलिसांवर कडाडून टीका केली होती. सोशल मीडियावर राज्य सरकार आणि मुंबई पोलिसांच्या विरोधातला सूर उमटत होता. तर काही काही सेलिब्रिटी देखील जाहीरपणे सरकारच्या विरोधात गेले.

आयुक्त परमबीर सिंह यांनी चौकशीचे आदेश दिल्यानंतर मुंबई सायबर सेल कामाला लागला असून त्यांनी काही हजारो फेक अकाऊंट्सची माहिती गोळा केली आहे. ही अकाऊंट्स इटली, जपान, पोलंड, इंडोनेशिया, तुर्की, थायलंड, रोमानिया आणि फ्रान्स चालवली जात होती. या देशांमधून या अकाऊंटवर पोस्ट पडत होत्या. सिंह म्हणाले की, बहुतेक अकाऊंट्सवरुन परकीय भाषेत पोस्ट अपलोड झालेल्या आहेत. त्यांनी #justiceforsushant #sushantsinghrajput and #SSR वापरले होते. आम्ही आणखी काही अकाऊंट्सचा तपास करत आहोत. हिंदुस्तान टाइम्स या इंग्रजी संकेतस्थळाने याबाबत वृत्त दिले आहे.

- Advertisement -

“मुंबई पोलिसांना बदनाम करण्यासाठी आणि आमच्या तपासाची दिशा भरकटवण्यासाठी ही ट्रोलिंग करण्यात आली होती. कोरोना महामारीमुळे त्यावेळी ८४ पोलीस शहीद झाले होते. ६ हजार पोलिसांना कोरोनाची लागण झाली होती. तरिही पोलिसांचे खच्चीकरण केले गेले. मुंबई पोलीस कमकुवत असल्याची एक प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न झाला. आम्ही या प्रकरणात गांभीर्याने तपास सुरु केला असून जे दोषी आढळतील त्यांच्यावर Information Technology Act कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल.”, अशी माहिती मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी दिली.

AIIMS च्या अहवालावर बोलताना परमबीर सिंह म्हणाले की, “आम्ही सुशांत प्रकरणात अतिशय काटेकोर पद्धतीने तपास करत होतो. सीबीआयने एम्समधील डॉक्टरांना अहवाल द्यायला सांगितला होता. त्या अहवालानुसार आमचा तपास योग्य असल्याचे सिद्ध होत आहे. कुपर हॉस्पिटलने काढलेले रिपोर्ट देखील खरे निघाले आहेत. फक्त काही लोक सोडले तर बाकी कुणीही आमच्यावर संशय घेतला नाही”, अशी टीका त्यांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -