घरताज्या घडामोडीमहाराष्ट्राची बदनामी करणाऱ्या गुप्तेश्वर पांडेंचा प्रचार फडणवीस आता करणार का?

महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्या गुप्तेश्वर पांडेंचा प्रचार फडणवीस आता करणार का?

Subscribe

महाराष्ट्र कोरोनाविरोधात युद्ध लढत असताना काही लोकांनी महाराष्ट्राविरोधात षडयंत्र रचले. सुशांत सिंह प्रकरणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्यांनी आता माफी मागितली पाहीजे. नाहीतर त्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही. एम्सचा अहवाल आल्यानंतर मुंबई पोलिसांचा तपास योग्य असल्याचे सिद्ध झाले आहे. बिहारचे माजी डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी महाराष्ट्र आणि मुंबईची बदनामी केली. ते आता बिहारमधून निवडणूक लढवत आहेत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे बिहार प्रभारी देवेंद्र फडणवीस आता त्यांच्या प्रचाराला जाणार का? असा प्रश्न राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उपस्थित केला आहे.

हे वाचा – ठाकरे सरकार आणि मुबंई पोलिसांच्या बदनामीसाठी ८०,००० फेक अकाऊंट उघडले

- Advertisement -

मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले की, बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी सुशांत सिंह प्रकरणात महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांची बदनामी केली. बिहार विधानसभेची निवडणूक जवळ येताच त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेऊन एका राजकीय पक्षात प्रवेश केला आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या भाजपचे बिहार निवडणुकांचे प्रभारी आहेत. त्यामुळे ते महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्या गुप्तेश्वर पांडेच्या प्रचाराला जाणार का? असा सवाल देशमुख यांनी उपस्थित केला आहे.

देशमुख पुढे म्हणाले की, AIIMS ने सीबीआयला दिलेल्या रिपोर्टमध्ये कुठेही विषप्रयोग झाल्याचे निष्पन्न झालेले नाही. वास्तविक कुपर रुग्णालयाच्या अहवालावरच एम्सकडून शिक्कामोर्तब झाले आहे. आता आम्ही सीबीआयच्या अंतिम रिपोर्टची वाट पाहत आहोत. त्यांनी तो लवकरात लवकर जाहीर करावा, अशी आमची मागणी आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -