घरताज्या घडामोडीSushant Suicide Case: सुशांतच्या AIIMS अहवालाने भाजप तोंडावर पडलं

Sushant Suicide Case: सुशांतच्या AIIMS अहवालाने भाजप तोंडावर पडलं

Subscribe

सुशांतसिंह राजपूत याच्या अकस्मात निधनाच्या एम्सने दिलेल्या अहवालाने भाजप नेत्यांची चांगलीच अडचण झाली आहे. मुंबई पोलीस आणि राज्य सरकारविरोधी गरळ ओकत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करेपर्यंत मजल गेलेले भाजपचे नेते या अहवालाने तोंडावर पडले आहेत. सुशांतसिंह राजपुतच्या मृत्यूचे रहस्य अजून उलगडलेले नाही. मात्र नुकतेच एम्स डॉक्टरांच्या समितीने अभ्यासात समोर आलेले तथ्य आणि माहिती सीबीआयकडे सोपवली आहे. एम्सच्या डॉक्टरांनी दिलेल्या अहवालात सुशांतच्या शरीरात नशेचे अवशेष नसल्याचे म्हटले आहे. या अहवालामुळे सीबीआयच्या तपासाची दिशाही बदलण्याची शक्यता आहे.

सुशांतसिंह राजपूत याच्या अकस्मात निधनाने देशभर एकच हलकल्लोळ निर्माण झाला होता. सुशांतने आत्महत्या केली नसून त्याची हत्या करण्यात आली असल्याचा आरोप करत भाजपच्या नेत्यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात पकडले होते. विशेष म्हणजे मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी महाविकास आघाडी सरकारला पाठीशी घालण्यासाठी सुशांत प्रकरणाची नोंद घेतली नाही, असा आरोप करत पोलीस आयुक्तांना बडतर्फ करण्याची मागणी भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्र पाठवून केली होती. तर काही नेत्यांसह अभिनेत्री कंगना रनौत हिने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली होती.

- Advertisement -

काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विट करत याच मुद्यावरून निशाणा साधला आहे. ‘सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात एम्स रुग्णालयाचा अहवाल आल्याने भाजपाचं तोंड काळं झालं आहे. तसंच सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच राजकारण करण्याच भाजपाचं षडयंत्रही बाहेर आलं आहे,’ अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

तत्पूर्वी, एम्स डॉक्टरांच्या समितीने अभ्यासात समोर आलेले तथ्य आणि माहिती सीबीआयकडे सोपवली आहेत. सोमवारी यासंबंधी सविस्तर बैठक पार पडली. एम्स डॉक्टरांनी दिलेली माहिती आणि गेल्या ४० दिवसांत सीबीआय तपासात आलेल्या गोष्टी एकत्र करुन पडताळून पाहिल्या जात आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -