घरमहाराष्ट्रआठवीत शिकणाऱ्या गर्भवती मुलीचा संशयास्पद मृत्यू

आठवीत शिकणाऱ्या गर्भवती मुलीचा संशयास्पद मृत्यू

Subscribe

गरोदर महिलेच्या मृत्यूचं ठोस कारण अद्याप समोर आलं नसून पोलीस याप्रकणी सखोल तपास करत आहेत.

आठवीत शिकणाऱ्या गर्भवती मुलीचा तिच्या घरातच संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना, पुण्याच्या उरळीकांचनमध्ये उघडकीला आली. प्राथमिक माहितीनुसार, मृत मुलगी ५ महिन्यांची गर्भवती असल्याचं शवविच्छेदन्यादरम्यान समोर आलं. दरम्यान मृत मुलीच्या वडिलांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात या प्रकरणाची लेखी तक्रार नोंदवली आहे. एका अज्ञात व्यक्तीने बलात्कार केल्यामुळे आपली मुलगी गर्भवती राहिल्याचं, त्यांनी या तक्रारीत नमूद केले आहे. याप्रकरणाचा तपास करत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत इंगवले यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘उरळीकांचन परिसरात राहणाऱ्या कुटुंबात हा प्रकार घडला. या कुटुंबातील आठवीत शिकणाऱ्या मुलीला कावीळ झाल्याप्रकरणी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी ती मुलगी गरोदर असल्याचे सांगत तिचे वडील तिला घरी घेऊन गेले. वडिलांनी आपल्या मुलीला घरी नेल्यानंतर ती गरोदर कशी राहिली याविषयी विचारणा केली. मात्र, त्यावेळी मुलींनी त्यांना काहीच सांगितले नाही.’


वाचा: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, पाणी कपातीची शक्यता

 

- Advertisement -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘मुलीला घरी नेल्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांच्या घरातून जोरदार आवाज आला. आवाज ऐकून जागे झालेल्या घरच्यांनी मुलीला बाथरुमध्ये बेशुद्ध पडलेले पाहिले. त्यानंतर ग्रामस्थांच्या साहाय्याने त्यांनी तिला ससून हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मुलीची तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. शवविच्छेदनादरम्यान सदर मुलगी ५ महिन्यांची गर्भवती असल्याचं समोर आलं. दरम्यान, एकदंर घटना पाहता हा ऑनर किंलींगचा प्रकार असल्याची स्थानिकांमध्ये कुजबूज आहे. मात्र, मृत्यूचं ठोस कारण अद्याप समोर आलं नसून पोलीस याप्रकणी सखोल तपास करत आहेत.


वाचा: महावितरणाचे ५५ लाचखोर कर्मचारी, पुन्हा कामावर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -