नारायण राणे लिहिणार आत्मचरित्र; कोणती गुपितं होणार उघड?

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष खासदार नारायण राणे आत्मचरित्रात लिहित असून 'अब आएगा मजा, सबका हिसाब होगा' अशा शब्दांमध्ये त्यांचे पुत्र नितेश राणे यांनीच आत्मचरित्राचे वर्णन केले आहे. त्यामुळे नारायण राणे आत्मचित्रात कोणती गुपितं उघड होणार? याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

Maharashtra
Narayan Rane
नारायण राणे

बॉलिवूडमध्ये सध्या राजकीय नेत्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट पाहायला मिळत आहेत. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, बाळासाहेब ठाकरे यांच्या बायोपिक नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील बायोपिक येत आहे. या स्पर्धेत आता आणखी एका राजकीय नेत्यानी एंट्री केली असून ते चित्रपट काढत नसून आत्मचरित्र लिहित असल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष खासदार नारायण राणे आत्मचरित्रात लिहित असून त्यात ते काय गौप्यस्फोट करणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

‘अब आएगा मजा, सबका हिसाब होगा’

‘माझे मार्गदर्शक आणि वडील नारायण राणे हे आत्मचरीत्र लिहित असून लवकरच त्यांच्या आत्मचिरत्राचे प्रकाशन होईल. अब आएगा मजा, सबका हिसाब होगा’, असे आमदार नितेश राणे यांनी बुधवारी दुपारी ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये नितेश राणे म्हणतात, माझे मार्गदर्शक आणि वडील नारायण राणे यांचे आत्मचरित्र येणार असून ‘अब आएगा मजा, सबका हिसाब होगा’, असे देखील त्यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे.

शिवसेनेबाबत काय लिहिणार?

शिवसेनेतून राजकीय कारकीर्दीला सुरुवात करणारे नारायण राणे शिवसेनेबाबत काय गौप्यस्फोट करणार? तसेच शिवसेनेबाबत ते आत्मचित्रात काय लिहिणार? त्याचबरोबर मोठ्या नेत्यांबाबत काही लिहिणार का याची उत्सुकता निर्माण झाली आहे. तसेच निलेश राणेंनी ‘अब आएगा मजा, सबका हिसाब होगा’ अशा शब्दांमध्ये त्यांचे पुत्र नितेश राणे यांनीच आत्मचरित्राचे वर्णन केले आहे. त्यामुळे नारायण राणे वादग्रस्त काय लिहिणार कायकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.


वाचा – नारायण राणेंच्या जुहू येथील बंगल्याविरोधात याचिका दाखल

वाचा – मच्छिमारांकडून हप्ते घेणाऱ्या शिवसेनेचा निषेध – नारायण राणे