घरमहाराष्ट्रस्वाईप मशीनचा वापर करुन फसवणूक करणारी टोळी गजाआड

स्वाईप मशीनचा वापर करुन फसवणूक करणारी टोळी गजाआड

Subscribe

घडलेला सगळा प्रकार पोलिसांना कळल्यानंतर त्यांनी तपास सुरु केला. पोलिसाच्या पथकांना जणांच्या संशयास्पद हालचालीची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला

कॅशलेस व्यवहारासाठी आपण अनेकदा एटीएमचा वापर करतो. पण ज्या ठिकाणी एटीएम कार्ड स्वाईप केले जाते त्या स्वाईप मशीनमुळे तुमची फसवणूक होऊ शकते असे सांगितले तर! स्वाईप मशीमधून फसवणूक करण्याचा प्रकार सातारमध्ये घडला असून पोलिसांनी या प्रकरणी सहा जणांच्या टोळीला अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून विविध बँकेचे कार्ड आणि १ लाख३२ हजार रुपये हस्तगत करण्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांनी दिली आहे.

वाचा- छोट्याशा व्यापाऱ्याने केली १० हजार कोटींची फसवणूक

प्रकरण काय?

वाठार येथील स्वामी पेट्रोल पंपावर काही अज्ञात व्यक्तिंनी त्यांच्याकडील एटीएमचा वापर करुन पंपावर असणाऱ्या स्वाईप मशीनमध्ये ६ हजार रुपये स्वाईप करायचे आणि स्वाईप मशीनच्या सेटिंगमधून झालेला व्यवहार रद्ध करुन ते पैसे स्वत:च्या अकाऊंटमध्ये जमा करुन घ्यायचे. ही बाब लक्षात येताच सदाशिव बेलगुफे यांनी वाठार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला.

- Advertisement -
वाचा- स्वेच्छानिवृत्त नौदल अधिकाऱ्याने केली नोकरीसाठी फसवणूक, घातला लाखोंचा गंडा

असा लागला आरोपींचा शोध

घडलेला सगळा प्रकार पोलिसांना कळल्यानंतर त्यांनी तपास सुरु केला. पोलिसाच्या पथकांना जणांच्या संशयास्पद हालचालीची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला आणि पोलिसांनी विजय सुर्यवंशी (२९), योगेश काळे (२७), नीलेश भिडे (३१), अशफाक शेख( 30), देविदास शिंदे (२८) आणि लक्ष्मीकांत पाटील (५०) या सहा संशयितांना पोलिसांनी अटक केली. त्यांची अधिक चौकशी केल्यानंतर त्यांनी त्यांच्या गुन्ह्याची कबुली दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -