घरमहाराष्ट्रअवनी वाघिणीच्या मृत्यूची चौकशी होणार: मुख्यमंत्री फडणवीस

अवनी वाघिणीच्या मृत्यूची चौकशी होणार: मुख्यमंत्री फडणवीस

Subscribe

सोशल मीडियाच्या माध्यमातून अवनी वाघिणीच्या मृत्यूवर प्रतिक्रीया उमटत असताना, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

अवनी वाघिणीच्या मृत्यूवर आता राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे. केंद्रीय मंत्री मनेका गांधी  आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यापाठोपाठ आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही याप्रकरणी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘अवनी वाघिणीला गोळी घालून ठार मारण्याचा निर्णय घ्यावा लागणं खेदजनक आहे. मात्र, या वाघिणीला मारण्याच्या प्रक्रियेत काही त्रुटी राहिल्यात का याची सखोल चौकशी केली जाईल’, अशी घोषणा मुख्यमंत्री फडणवीसांनी केली आहे. याविषयी प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले, टी- १ वाघिणीला अशाप्रकारे मारणं खरंच दु:खद
आहे. केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांचे प्राणीप्रेम आम्हाला ठाऊक आहे. त्यांनी कठोर शब्दात केलेली टीकाही आम्ही समजू शकतो. नेमकी घटना काय घडली आणि याप्रकणरात काय चुका राहिल्यात याचा तपास केला जाणार आहे.”

- Advertisement -


नेमकं प्रकरण काय? 

अवनी वाघिणीने यवतमाळ जिल्ह्यामध्ये दहशत पसरवली होती. नरभक्षक असा करार दिलेल्या या वाघिणीने १४ माणासंचे बळी घेतले होते.  या वाघिणीच्या शोधात असलेल्या वन विभागाला शुक्रवारी मध्यरात्री १ वाजता राळेगावच्या जंगलामध्ये ती दिसली. त्यानंतर तिला जेरबंद करण्यासाठी वन विभागाने तिला बेशुद्धीचं इंजेक्शन मारलं. मात्र, यामुळे अर्धवट जखमी झालेल्या अवनीने वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या दिशेने यायला सुरुवात केली. त्यामुळे टीममधील शार्प शूटर अजर अलीने तिच्यावर गोळी झाडली, ज्यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर देशभरातून लोक सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत आहेत. ‘अवनी वाघिणीला अशाप्रकारे ठार करणं हे गैर असल्याच्या’ प्रतिक्रिया नेटिझन्स देत आहेत. त्यानंतर आता राजकीय वर्तुळातूनही याविषयीच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.


सावधान: फटाके वेळेतच उडवा; नाहीतर ८ दिवस तुरुंगात जा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -