घरमहाराष्ट्रफोनवर बोलणाऱ्या बस चालकाचा फोटो काढा, बक्षिस मिळवा!

फोनवर बोलणाऱ्या बस चालकाचा फोटो काढा, बक्षिस मिळवा!

Subscribe

अनेकदा पीएमपीचे चालक बस चालवत असताना फोनवर बोलताना दिसून येतात. पीएमपीकडे याबाबत अनेकदा तक्रार करुनही फारशी कारवाई होत नसल्याते चित्र आहे. चालक बस चालवत असताना फोनवर बोलत असताना स्वतःसोबतच प्रवाशांचा जीवही धोक्यात घालत असतात. पण आता चालक बस चालवत असताना फोनवर बोलत असेल तर प्रवाशांना बक्षीस मिळविण्याची नामी संधी असून चालत्या बसमध्ये मोबाईलवर बोलताना चालकाचा फोटो पाठविणाऱ्यांना पीएमपीकडून एक हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे.

या निर्णयावर पुणे महानगर परिवहन महामंडळाने शिक्कामोर्तब केले असून, त्याची अंमलबजावणीही सुरु झाली आहे. अनेक घटनांमधून पीएमपी चालकांची मुजोरी समोर आली आहे. रात्रीच्या वेळी प्रवास करत असताना एका महिलेला नुकताच महिलांसाठी राखीव असणाऱ्या ठिकाणी जागा करुन न देता तिच्या पतीला खाली उतरविण्याचा प्रकार घडला होता. प्रवाशांना पीएमपीचे कर्मचारी सहकार्य करत नसल्याचे चित्र असून पीएमपी प्रशासनाने काही वर्षांपूर्वी या चालकांना आवर घालण्यासाठी ही योजना तयार केली होती.

- Advertisement -

त्यानुसार चालकांचे छायाचित्र काढणाऱ्या प्रवासी, नागरिकांना एक हजार रुपये बक्षीस दिले जात होते. ही योजना मागील वर्षी गुंडाळण्यात आली होती. प्रवासी संघटनांनी ही योजना पुन्हा सुरु करण्यासाठी पाठपुरावा केला होता. पीएमपीच्या अध्यक्षा नयना गुंडे यांनी त्यानुसार योजनेला मान्यता दिली आहे.

नवीन योजनेनुसार चालक बस चालवताना मोबाईलवर बोलताना आढळून आल्यास त्याला २ हजार रुपयांचा दंड केला जाईल. त्याच्या वेतनातून या दंडाची रक्कम वसूल करण्यात येणार आहे. त्यापैकी एक हजार रुपये छायाचित्र पाठविणाऱ्यास, तर एक हजार रुपये कामगार कल्याण योजनेमध्ये वर्ग केले जातील तसेच तक्रारदाराला महिन्यातून केवळ तीन छायाचित्रांसाठीच बक्षीस मिळणार आहे. उर्वरित छायाचित्रांसाठीची बक्षीस रक्कम कामगार कल्याण योजनेत जमा केली जाईल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

- Advertisement -

पीएमपीच्या वाहतूक विभागाकडे किंवा संकेतस्थळावर चालत्या बसमध्ये फोनवर बोलणाऱ्या चालकाचे छायाचित्र पाठवावे लागणार आहे. बसचा क्रमांक या छायाचित्रावर आवश्यक आहे. त्याचबरोबर प्रवासाची वेळ, मार्ग क्रमांक व बस कोठून कोठे जात होती, ही माहिती नमूद करणे आवश्यक आहे. त्यानुसार शहानिशा करुन संबंधितांना बक्षिसाची रक्कम दिली जाणार आहे.

Priya Morehttps://www.mymahanagar.com/author/priya/
गेल्या ६ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत आहे. मला लिहायला, वाचायला आवडतेच पण त्यासोबतच मला नविन ठिकाणी फिरायला खूप आवडते. सध्या नविन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -